पुण्यात वाहतुककोंडी सोडवायला उड्डाणपूल बांधला, आता उड्डाणपुलावर होतंय ट्रॅफीक जाम!

On: May 3, 2025 4:23 PM
pune flyover
---Advertisement---

Pune Flyover | नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावर (सिंहगड रस्ता) (Narveer Tanaji Malusare Road/Sinhagad Road) वाहतूक कोंडी कमी करण्याच्या उद्देशाने नुकताच एक उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. राजाराम पूल (Rajaram Bridge) ते फनटाइम थिएटर (Funtime Theatre) दरम्यान असलेल्या या पुलामुळे काही सिग्नल टाळण्यात यश आले असले तरी, सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत पुलावरच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याचे चित्र दिसत आहे, ज्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.

उड्डाणपुलामुळे पाच सिग्नल टळले-

नवनिर्मित उड्डाणपुलाची एक मार्गिका १ मे, महाराष्ट्र दिनापासून (Maharashtra Day) वाहतुकीकरिता उपलब्ध करून देण्यात आली आहे. या पुलामुळे राजाराम पुलाच्या (Pune Flyover)  बाजूने धायरी (Dhayari) दिशेने प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण या मार्गावरील पूर्वीचे पाच महत्त्वाचे सिग्नल आता टाळले जात आहेत, ज्यात प्रकाश इनामदार चौक (Prakash Inamdar Chowk), हिंगणे चौक (Hingne Chowk), संतोष हॉल (Santosh Hall), माणिक बाग (Manik Baug) आणि वीर शिवा काशिद चौक (Veer Shiva Kashid Chowk) (इंडियन ह्युम पाईप कंपनीजवळ) यांचा समावेश आहे.

यामुळे वाहनांना सलग आणि वेगवान प्रवास करणे शक्य झाले आहे, ज्यामुळे वेळेची बचत होत आहे. अडथळ्यांशिवाय थेट मार्ग उपलब्ध झाल्याने वाहतुकीचा वेग वाढल्याचे दिसून येत आहे.

पूल संपताच सिग्नलमुळे कोंडीची समस्या-

उड्डाणपुलामुळे वाहनांना (Pune Flyover)  मिळालेला वेग फार काळ टिकत नाही, कारण पूल संपल्यानंतर अवघ्या ५० मीटर अंतरावर असलेल्या वडगाव सिग्नलजवळ (Vadgaon Signal) त्यांना थांबावे लागते. विशेषतः सायंकाळच्या वेळी, जेव्हा एकाच वेळी अनेक वाहने पुलावरून उतरून या सिग्नलपर्यंत पोहोचतात, तेव्हा मोठा ताण निर्माण होतो. परिणामी, सिग्नल लागल्यावर वाहने पुलावरच थांबतात आणि ही रांग मागे फनटाइम थिएटरपासून माणिक बाग चौकापर्यंत लांबते.

१ मे रोजी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाची सार्वजनिक सुट्टी असल्याने रस्त्यावर वाहनांची वर्दळ कमी होती. मात्र, दुसऱ्या दिवशी, शुक्रवारी कार्यालयीन आणि शाळा सुटण्याच्या वेळांमुळे सायंकाळी नव्या पुलावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्याचे स्पष्टपणे दिसून आले.

News Title – New Pune Flyover Causes Evening Traffic Jams

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now