न. ता. वाडीमध्ये नवीन उड्डाणपूल?; वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी हालचाली सुरू

On: February 25, 2025 11:40 AM
Nashik Traffic Plan
---Advertisement---

N. T. Wadi Flyover l पुण्यातील कृषी महाविद्यालय चौकापासून न. ता. वाडीकडे जाणाऱ्या के. बी. जोशी रस्त्यावर उड्डाणपूल बांधून तो थेट जुन्या मुंबई-पुणे (Mumbai-Pune) रस्त्याला जोडण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या उड्डाणपुलामुळे गणेशखिंड रस्ता आणि नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्त्यावरून (फर्ग्युसन कॉलेज रस्ता) जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावर जाण्यासाठी संचेती हॉस्पिटलसमोरील (Sancheti Hospital) पुलावर जाण्याची आवश्यकता भासणार नाही.

वाहतूक कोंडीची समस्या :

गणेशखिंड रस्त्यावरील बहुतांश वाहनांना जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावरून खडकी, वाकडेवाडीच्या दिशेने जाण्यासाठी सुभाषचंद्र बोस चौकातून (संचेती रुग्णालय) डावीकडे वळून जावे लागते. मोठ्या वाहनांसाठी हा एकमेव मार्ग असल्याने या चौकात मोठ्या प्रमाणात गर्दी होते. के. बी. जोशी रस्त्यावरून न. ता. वाडीमार्गे जाणाऱ्या वाहनांना ‘अंडरपास’मधून जाता येत असले, तरी हा रस्ता छोटा असल्यामुळे येथून प्रवास करण्यावर मर्यादा आहेत.

N. T. Wadi Flyover l प्रस्तावित उड्डाणपूल :

या पार्श्वभूमीवर, जुन्या के. बी. जोशी रस्त्यावर कृषी भवनासमोरून या उड्डाणपुलाची सुरुवात अपेक्षित आहे. हा उड्डाणपूल कृषी महाविद्यालय चौकापासून जुन्या मुंबई-पुणे रस्त्याकडे जाण्यासाठी तयार करण्याचे सध्या प्रस्तावित आहे. उड्डाणपुलाची सुरुवात कृषी भवनासमोरून करण्यात येणार असून, न. ता. वाडीमार्गे उड्डाणपुलाचा एक रस्ता वाकडेवाडीच्या दिशेने आणि दुसरा रस्ता शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या दिशेने उतरेल.

व्यवहार्यता तपासणी :

या चौकातील गर्दी कमी करण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. प्रस्तावित उड्डाणपुलासाठी सल्लागार नियुक्त केल्यानंतर हा पूल बांधणे शक्य होणार आहे का? तेथून जाणाऱ्या वाहनांची संख्या याबाबतचा व्यवहार्यता अहवाल तयार करण्यात येईल. वाहतूक पोलिसांकडूनही या उड्डाणपुलासाठी आग्रह धरण्यात येत असल्याने महापालिकेने या उड्डाणपुलासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

महापालिकेच्या आगामी अर्थसंकल्पात या पुलाची घोषणा होण्याची शक्यता असून, त्यासाठी सल्लागार नियुक्त करण्यासाठी आर्थिक तरतूद करण्याबाबत चर्चा सुरू आहे.मध्यवर्ती शहरातून जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावर जाण्यासाठी सुभाषचंद्र बोस चौकातून (संचेती रुग्णालय) डावीकडे वळून जावे लागते.

News Title: New Flyover at N. T. Wadi? Feasibility Study to Decongest Traffic

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now