रणजीत कासलेंच्या अडचणीत वाढ, सुदर्शन काळेकडून एवढी रोकड घेतल्याचा खुलासा!

On: April 28, 2025 1:37 PM
ranjeet kasle
---Advertisement---

Ranjeet Kasle | बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येप्रकरणात आरोपी असलेल्या वाल्मिक कराड (Walmik Karad) व माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर आरोप करणाऱ्या बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासले (Ranjeet Kasale) यांची अडचण आणखी वाढली आहे. त्यांच्या विरोधात मुलाच्या शिक्षणासाठी घेतलेल्या कर्जाच्या प्रकरणी अंबाजोगाई (Ambajogai) शहर पोलीस ठाण्यात नवीन गुन्हा दाखल झाला आहे.

अंबाजोगाईत कर्जवसुलीच्या प्रकरणी गुन्हा-

रणजीत कासले यांनी सुदर्शन काळे यांच्याकडून मुलाच्या शैक्षणिक गरजेसाठी दहा लाख रुपये उसनवारीने घेतल्याची माहिती समोर आली आहे. परंतु त्यातील अडीच लाख रुपये परत न केल्याने सुदर्शन काळे यांनी तक्रार दाखल केली आहे. यानंतर अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात कासले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

यापूर्वी कासले यांनी परळी विधानसभा निवडणुकीच्या काळात धनंजय मुंडे यांच्या प्रतिनिधीकडून दहा लाख रुपये मिळाल्याचा दावा केला होता. मात्र तपासात हा दावा खोटा असल्याचे निष्पन्न झाले आहे. सद्यस्थितीत रणजीत कासले छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथील हर्सुल कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत.

सुरक्षेच्या कारणास्तव रणजीत कासलेची हलवणूक-

सुरक्षा धोक्याच्या पार्श्वभूमीवर बीड कारागृहात असलेला रणजीत कासले (Ranjeet Kasale) याला हर्सुल कारागृहात हलवण्यात आले आहे. बीड कारागृहात वाल्मिक कराड (Walmik Karad), सुदर्शन घुले व अन्य आरोपी ठेवले आहेत. कासलेने वाल्मिक कराडवर गंभीर आरोप केल्याने त्याच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. सध्या ॲट्रॉसिटी प्रकरणातही कासले न्यायालयीन कोठडीत आहे. बीड जिल्ह्यात शिवाजीनगर, अंबाजोगाई शहर आणि परळी पोलीस ठाण्यांत त्याच्यावर एकूण तीन गुन्हे दाखल आहेत.

दरम्यान, पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर बीड पोलीस अधिक सतर्क झाले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकही पाकिस्तानी नागरिक सापडलेला नसला तरी पाकिस्तान व बांगलादेशी नागरिकांचा शोध सुरू आहे. बीड पोलिसांनी नागरिकांना संशयास्पद व्यक्ती दिसल्यास त्वरित माहिती देण्याचे आवाहन केले आहे.

News Title – New Case Filed Against Ranjeet Kasale in Beed

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now