Neha Kakkar | प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर (Neha Kakkar) मेलबर्नमधील एका कॉन्सर्टदरम्यान एका वादग्रस्त प्रसंगाला सामोरी गेली. स्टेजवर तिच्या उशिरामुळे प्रेक्षकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत तिला परत जाण्यास सांगितलं. यामुळे नेहा भावुक होत स्टेजवरच रडू लागली.
तीन तास उशिरा पोहोचल्यामुळे नेहावर पेक्षकांचा संताप
मेलबर्न (Melbourne), ऑस्ट्रेलिया येथे आयोजित करण्यात आलेल्या लाईव्ह कॉन्सर्टसाठी नेहा कक्कर तब्बल तीन तास उशिरा पोहोचली. नेहाच्या इतक्या उशिरामुळे प्रेक्षकांमध्ये असंतोष पसरला आणि तिने स्टेजवर पाऊल ठेवताच तिला जोरदार हूटिंगचा सामना करावा लागला. उपस्थितांमध्ये नाराजी इतकी होती की काहींनी तिला परत जाण्याची स्पष्ट मागणी केली.
प्रेक्षकांनी “तू परत जा”, “आम्ही तीन तासांपासून वाट पाहतोय”, “हॉटेलमध्ये जाऊन आराम कर” अशा टोमण्यांनी नेहाला लक्ष्य केलं. याशिवाय, “हे काही भारत नाही, हे ऑस्ट्रेलिया आहे” आणि “हे इंडियन आयडॉल नाही” अशा कठोर प्रतिक्रिया देत लोकांनी तिच्या माफीचीही दखल घेतली नाही. त्यामुळे या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.
नेहा रडली, प्रेक्षकांना मागितली माफी
प्रेक्षकांच्या रोषाचा सामना करताना नेहा कक्कर (Neha Kakkar) स्टेजवरच भावूक झाली. तिने सांगितलं की – “मी आयुष्यात कधीच कोणालाही वाट पाहायला लावलं नाही. तुम्हाला इतका वेळ थांबवून ठेवलं याचा मला खूप खेद आहे.” तिच्या या वक्तव्यानंतर तिने संध्याकाळ लक्षात ठेवण्यासारखी असल्याचंही नमूद केलं.
नेहाने प्रामाणिकपणे माफी मागण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रेक्षकांचा रोष काही कमी झाला नाही. तिच्या अश्रूंनाही प्रतिसाद न मिळाल्यामुळे तिला व्यासपीठावरच ढसाढसा रडावं लागलं. याचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.
Neha Kakkar crying for being 3 hrs late at a Melbourne show
She also performed for less than 1 hour #NehaKakkar pic.twitter.com/TGyhaeCjpu— Redditbollywood (@redditbollywood) March 24, 2025
Title : Neha Kakkar Breaks Down at Melbourne Show








