नीट परीक्षा घोटाळा; ब्युटी पार्लर चालक मनिषावर गंभीर आरोप, तपासात धक्कादायक खुलासा

On: May 18, 2026 4:08 PM
Manisha Waghmare
---Advertisement---

NEET Paper Leak |  देशभरात चर्चेत असलेल्या NEET (NEET) पेपरफुटी प्रकरणात लातूर (Latur) कनेक्शनचा तपास अधिक वेगाने सुरू असून, या प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरसीसी (RCC) खाजगी कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर (Shivraj Motegaonkar) यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या प्रकरणातील आरोपी मनिषा वाघमारे (Manisha Waghmare) हिच्याविरोधातील महत्त्वाची कागदपत्रे समोर आली असून तपासात तिची सक्रिय भूमिका स्पष्ट झाली आहे.

मनिषा वाघमारेची भूमिकाच तपासाचा केंद्रबिंदू

सीबीआयच्या तपासानुसार, पुणे (Pune) येथील मनिषा वाघमारे ही पेपरफोडीच्या रॅकेटमधील सक्रिय सदस्य होती. २७ एप्रिल २०२६ रोजी तिने काही शासकीय कर्मचाऱ्यांच्या मदतीने परीक्षा प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका परीक्षेपूर्वीच मिळवल्याचा आरोप आहे.

पुणे पोलिसांनी अटक केल्यानंतर सध्या ती सीबीआय कोठडीत असून चौकशीत अनेक महत्त्वाचे धागेदोरे समोर आले आहेत. तपासात तिने इतर आरोपींसोबत संगनमत करून प्रश्नपत्रिका मिळवल्याचे उघड झाले आहे.

नाशिकपर्यंत पोहोचले पेपरफुटीचे जाळे

मनिषा वाघमारेने तिचा मित्र धनंजय लोखंडे (Dhananjay Lokhande) याच्या माध्यमातून नाशिक (Nashik) येथील समुपदेशक शुभम खैरनार (Shubham Khairnar) याच्याशी संपर्क साधला आणि त्याला प्रश्नपत्रिका पुरवल्याचा आरोप आहे.

३ मे रोजी परीक्षा होण्यापूर्वी तब्बल आठ दिवस आधीच प्रश्नपत्रिका तिच्याकडे आल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. कारवाई टाळण्यासाठी तिने पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न केल्याने तपासात अडथळे निर्माण झाल्याचा दावा सीबीआयने केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by थोडक्यात (@thodkyaat)

घरझडतीत महत्त्वाचे पुरावे

१३ मे रोजी रात्री ८.३० वाजल्यापासून १४ मे दुपारी २.३० वाजेपर्यंत पोलिसांनी मनिषा वाघमारेच्या घराची सखोल झाडाझडती घेतली. या तपासानंतर तिच्याविरोधात अधिकृत गुन्हा दाखल करण्यात आला.

सीबीआयच्या मते, अटकेनंतरही तिने पेपर मिळालेल्या सर्व विद्यार्थ्यांची नावे आणि तपशील पूर्णपणे उघड केलेले नाहीत, त्यामुळे तपासात अडथळे येत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

News Title: NEET Paper Leak New Twist CBI Reveals Manisha Waghmare Role Paper Leak

Join WhatsApp Group

Join Now