गळ्यात नेकबँड घालून बोलत असाल तर आत्ताच व्हा सावध; भयानक प्रकार समोर

On: February 7, 2025 1:22 PM
Neckband Blast Kills Youth in Lucknow
---Advertisement---

Neckband Blast Kills Youth in Lucknow

Neckband Blast | आजकाल अनेकजण कानात हेडफोन्स (Headphones), नेकबँड (Neckband Blast) घालून बोलताना दिसतात. मात्र, यामुळे अनेकवेळा दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे. अशीच एक दुर्दैवी घटना उत्तर प्रदेशची (Uttar Pradesh) राजधानी लखनऊमध्ये (Lucknow) घडली. येथे नेकबँड घातलेल्या तरुणाचा स्फोटामुळे (Blast) जागीच मृत्यू झाला.

नेमके काय घडले?

लखनऊमधील सेक्टर 17, इंदिरा नगर येथे राहणारा 27 वर्षीय आशिष (Ashish) गळ्यात नेकबँड घालून फोनवर बोलत होता. बोलत असताना अचानक नेकबँडमध्ये स्फोट झाला आणि तो जागीच कोसळला. त्याच्या कुटुंबीयांना आणि शेजाऱ्यांना घटनेची माहिती मिळताच, त्यांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

वाढता धोका:

आजकाल बहुतेक लोक फोनवर बोलण्यासाठी ब्लूटूथ नेकबँड (Bluetooth Neckband) आणि इअरबड्सचा (Earbuds) वापर करतात. गेल्या काही वर्षांत इअरफोन्सचा (Earphones) वापर खूप वाढला आहे. वायर्ड इअरफोन्सऐवजी (Wired Earphones) अनेकजण चार्जिंगवाले इअरफोन किंवा इअरबड वापरणे पसंत करतात. हे इअरफोन वापरण्यास सोपे असले तरी, त्यांच्या वापरामुळे धोका वाढल्याचे अनेक घटनांमधून समोर आले आहे.

स्फोटाचे कारण:

आशिष मंगळवारी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास गच्चीवर (Terrace) गळ्यात नेकबँड घालून बराच वेळ कोणाशीतरी बोलत होता. त्याची आई आणि बहीण त्याला शोधत होत्या. त्याचवेळी आशिष गच्चीवर पडलेला दिसला. त्याच्या शरीराचा बराच भाग जळाला होता. त्याच्या छाती, पोट व उजव्या पायाची कातडी फाटलेली होती.

गळ्यात घातलेला ब्लूटूथ नेकबँड वितळलेल्या अवस्थेत खाली लटकत होता. या घटनेमुळे नेकबँडच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नेकबँड वापरताना काळजी घेणे आवश्यक आहे.

Title : Neckband Blast Kills Youth in Lucknow

 

Join WhatsApp Group

Join Now