पुण्यात मोठा राडा; राष्ट्रवादीच्या आमदाराला मारहाण, शर्टही फाडला….

On: October 5, 2025 12:15 PM
Sharad Pawar
---Advertisement---

Pune News | वडगाव शेरी मतदारसंघातील राजकारण गुरुवारी रात्री तापले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) (Sharad Pawar Faction) चे आमदार बापू पठारे (Bapusaheb Pathare) आणि अजित पवार गटाचे (Ajit Pawar Faction) पदाधिकारी बंडू खांदवे (Bandu Khandave) यांच्यात लोहगाव येथे झालेल्या रस्त्यांच्या कामावरून शाब्दिक वादाचे रूपांतर धक्काबुक्कीत झाले. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

ही घटना लोहगाव परिसरात माजी सैनिकांच्या सत्कार समारंभादरम्यान घडली. कार्यक्रमात रस्त्यांच्या स्थानिक कामांवरून बापू पठारे आणि बंडू खांदवे यांच्यात शाब्दिक वाद झाला. वाद विकोपाला गेला आणि दोघांच्या समर्थकांमध्ये झटापट झाली.

बंडू खांदवे यांनी केलेले आरोप

” कार्यक्रम स्थळी आमदार बापूसाहेब पठारे आले असता ते मला म्हणाले, बंड्या तुला लई माज आला आहे का? तू अशी पोस्ट का केली. मी त्यांना म्हणालो अप्पा मी तुमचा आदर करतो. मी तुमच्या विरोधात काही बोललो नाही प्रशासनाला जाग येण्यासाठी हे आंदोलन आहे आणि मी त्यांना हात जोडून म्हणालो प्रशासनाच्या विरोधात बोलायचा मला अधिकार आहे. त्यानंतर त्यांनी मला आई-बहिणीवरून शिव्या दिल्या माझी गचंडी पकडली मला मारहाण करत मला खाली पाडले. त्यांच्या चालकाने सुद्धा मला मोठ्या प्रमाणात मारहाण केली. इतकंच नाही तर मला म्हणाले तुमचे गाववाले किती शहाणे आहेत मला माहित आहे. गाववाले कसे विकत घ्यायचे मला माहित आहे. त्यामुळे तू मला गावच्या हिताच्या गोष्टी शिकवू नकोस. असं म्हणत मला जीवे मारण्याची धमकी दिली आहे’. तसेच मी त्यांना कोणत्याही प्रकारची मारहाण केली नसल्याचे त्यांनी सांगितले.

Pune News | आमदार बापूसाहेब पठारे यांचे प्रत्युत्तर

तर आमदार बापूसाहेब पठारे यांनी हे आरोप फेटलेले. ते म्हणाले ” 08 डिसेंबर 2023 रोजी रोडला 31 कोटी रुपये मंजूर झाले होते, तर 2024 पर्यंत कोणी काम अडवले होते. जर आपल्याला रोड करण्यासाठी ज्ञान प्राप्त असतं तर आपण समजून घेतले असते. परंतु राजकारण म्हणून आंदोलन करणं हे तुम्हाला शोभत का? त्या रस्त्यावर पाण्याच्या लाईन नव्हत्या, ड्रेनेजच्या लाईन नव्हत्या, नागरिकांनी त्या जोडल्या नव्हत्या तर रस्ते कसे करायचे होते. मग राजकारण म्हणून जन आक्रोश आंदोलन करायचे का ? मग 5 वर्षांमध्ये सत्तेमध्ये होते तेव्हा आर पी रस्ते, डीपी रस्ते का केले नाही कुणी अडवले होते का ? आपण मग आता चुकीची यादी दाखवून लोकांना फसवण्याचे काम करता का ? असा माझा सवाल आहे. समोर येऊन बोला माझ्याबरोबर खोटं राजकारण करू नका. जनता माफ करणार नाही.” अशी प्रतिक्रिया आमदार बापूसाहेब पठारे यांनी दिली आहे.

या घटनेनंतर विमानतळ पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती.

स्थानिक रस्त्यांच्या विकासकामांवरून सुरु असलेला हा वाद आता थेट राजकीय नेत्यांच्या धक्काबुककीपर्यंत पोहोचल्याने वडगाव शेरी मतदारसंघात चांगलाच राजकीय तणाव निर्माण झाला आहे.

News Title :- Big clash between the two NCP factions in Pune

Join WhatsApp Group

Join Now