म्हाळुंगे येथे राष्ट्रवादीला उस्फूर्त प्रतिसाद; पादयात्रेत नागरिकांचा मोठा सहभाग

On: January 8, 2026 3:08 PM
Mahalunge News
---Advertisement---

Mahalunge News | म्हाळुंगे परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या पादयात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त आणि लक्षणीय प्रतिसाद मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले. प्रत्येक उपविभागात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होत असल्याने परिसरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दारोदारी जाऊन संवाद साधण्याच्या या उपक्रमामुळे नागरिकांना थेट आपली मते मांडण्याची संधी मिळाली असून, स्थानिक पातळीवरील प्रश्न चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.

या पादयात्रेदरम्यान नागरी सुविधा, सुरू असलेली विकासकामे, पायाभूत सोयी-सुविधा आणि भविष्यातील अपेक्षा यावर सखोल चर्चा करण्यात आली. नागरिकांनी रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, वीज, आरोग्य आणि शिक्षणाशी संबंधित प्रश्न थेट नेत्यांसमोर मांडले. त्यामुळे ही पादयात्रा केवळ प्रचारापुरती मर्यादित न राहता संवादाचे प्रभावी माध्यम ठरत असल्याचे चित्र दिसून आले.

नेत्यांचा थेट संवाद; विकासाचा अजेंडा मांडला :

या पादयात्रेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार गायत्री मेढे-कोकाटे (Gayatri Medhe Kokate) यांच्यासह बाबुराव चांदेरे, पार्वती निम्हाणे आणि अमोल बालवडकर यांचा सक्रिय सहभाग होता. नेत्यांनी प्रत्येक घरात जाऊन नागरिकांशी संवाद साधत स्थानिक विकास, प्रशासनाची भूमिका आणि भविष्यातील नियोजनाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. ‘विकास हा केवळ आश्वासनांपुरता न राहता प्रत्यक्ष कृतीतून दिसला पाहिजे,’ असा ठाम संदेश यावेळी देण्यात आला.

नेत्यांनी नागरिकांच्या समस्या ऐकून घेत तातडीच्या आणि दीर्घकालीन उपाययोजनांबाबत चर्चा केली. परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. त्यामुळे पादयात्रेला केवळ राजकीय नव्हे, तर सामाजिक स्वरूपही प्राप्त झाल्याचे मत स्थानिक नागरिक व्यक्त करताना दिसले. (Mahalunge News)

Mahalunge News | भाजपमधून आलेल्या पदाधिकाऱ्यांचा सहभाग; पक्षाला बळ :

दरम्यान, याच आठवड्यात विजय संकल्प यात्रेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या भाजपच्या माजी पदाधिकाऱ्यांनी या पादयात्रेत सक्रिय सहभाग घेतला. कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे माजी सरपंच संपर्क प्रमुख काळुराम गुलाब गायकवाड, सुस-महाळुंगे प्रभागाचे भाजपचे माजी उपसरपंच व अध्यक्ष राजेंद्र भिमा पाडाळे यांच्यासह खंडू काशिनाथ खैरे, अनिल गायकवाड, भगवान कामठे, ओम गायकवाड आणि ओम संतोष पाडाळे यांनी पक्षाला उघड पाठिंबा दर्शवला. (NCP public response)

या सहभागामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची स्थानिक ताकद वाढल्याचे बोलले जात असून, आगामी निवडणुकांच्या दृष्टीने हा बदल महत्त्वाचा मानला जात आहे. विविध पक्षांतील अनुभवी कार्यकर्ते राष्ट्रवादीत येत असल्याने पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला बळ मिळत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

स्थानिक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती; निवडणूक समीकरणांना महत्त्व :

पादयात्रेदरम्यान पोलीस पाटील शांताराम पाडाळे, वामनराव कोळेकर, निलेश पाडाळे, सोपानराव खैरे, सुखदेव कोळेकर, विजय कोळेकर, नामदेवराव गोलांडे, युवराज कोळेकर, हरिश्चंद्र गायकवाड, जितेंद्र कोळेकर, राहुल दादा, किसन पारडे, काळुराम गायकवाड, राजेंद्र पाडाळे, नंदकुमार पाडाळे, समीर कोळेकर, किसनराव सुतार, रामराव पाडाळे, ज्ञानेश्वर पाडाळे, मनोज पाडाळे, धनराज निकळजे, आनंदराव कांबळे, प्रकाश तात्या आणि अनिल तात्या यांच्यासह अनेक सामाजिक प्रतिनिधी उपस्थित होते.

पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, पादयात्रेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा स्थानिक प्रश्नांबाबत नागरिकांमध्ये असलेल्या जागरूकतेचे प्रतीक आहे. म्हाळुंगे परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसला मिळत असलेला वाढता पाठिंबा आगामी निवडणूक राजकारणात निर्णायक ठरू शकतो, असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे.

News Title: NCP Gets Strong Public Response in Mahalunge as Foot March Draws Massive Participation

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now