नागरिकांनो 25 मे ते 2 जूनपर्यंत घराबाहेर पडण्यापूर्वी ‘ही’ बातमी नक्की वाचा!

On: May 25, 2026 3:06 PM
Nautapa 2026
---Advertisement---

Nautapa 2026 | मे महिन्याच्या अखेरीस उष्णतेची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ज्योतिषशास्त्रानुसार 25 मेपासून सुरू होणारा ‘नौतपा’ कालावधी पुढील नऊ दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या काळात तापमानात मोठी वाढ होऊन उष्णतेचे चटके अधिक तीव्र होऊ शकतात, असा इशारा ज्योतिर्विदांनी दिला आहे.

दुपारी 3.43 वाजता सुरू होणार बदल:

प्रसिद्ध ज्योतिर्विद आनंद पिंपळकर (Anand Pimpalkar) यांच्या माहितीनुसार, 25 मे 2026 रोजी दुपारी 3 वाजून 43 मिनिटांनी सूर्य रोहिणी नक्षत्रात प्रवेश करणार आहे. याच क्षणापासून ‘नौतपा’ या विशेष कालखंडाची सुरुवात होणार असल्याचे सांगितले जात आहे. 2 जूनपर्यंत चालणाऱ्या या काळात सूर्यकिरणे थेट पृथ्वीवर पडल्याने उष्णतेची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.

ज्योतिषशास्त्रात रोहिणी नक्षत्राला विशेष महत्त्व दिले जाते. सूर्य हा अग्नितत्त्वाचा ग्रह मानला जातो आणि तो चंद्राच्या अधिपत्याखालील रोहिणी नक्षत्रात प्रवेश करताच पृथ्वीवरील तापमान झपाट्याने वाढते, असे मानले जाते. त्यामुळे या नऊ दिवसांत उष्णतेची लाट अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या काळात नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचा सल्लाही दिला जात आहे.

Nautapa 2026 |मान्सूनशी जोडला जातो ‘नौतपा’:

लोकपरंपरेनुसार ‘नौतपा’ हा केवळ उन्हाचा कालावधी नसून तो आगामी मान्सूनसाठी महत्त्वाचा टप्पा मानला जातो. पारंपरिक समजुतीनुसार या दिवसांत पृथ्वी जितकी जास्त तापते, तितका पुढील पावसाळा चांगला होतो, असे सांगितले जाते. त्यामुळे कृषी आणि हवामानाशी संबंधित चर्चांमध्ये या कालखंडाला विशेष महत्त्व दिले जाते.

ज्योतिषशास्त्रात ‘रोहिणी नक्षत्र गळणे’ ही संकल्पनाही प्रसिद्ध आहे. या नऊ दिवसांत जर अचानक पाऊस पडला, तर त्याचा मान्सूनच्या पुढील चक्रावर परिणाम होऊ शकतो, अशी धारणा आहे. 2 जूननंतर 8 जून रोजी सूर्य मृगशिरा नक्षत्रात प्रवेश करेल आणि त्यानंतर मान्सूनच्या हालचालींना वेग येण्यास सुरुवात होईल, असे मानले जाते.

News Title | Nautapa 2026 Heatwave Alert

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now