Natasa Stankovic Troll l क्रिकेटपटू हार्दिक पांड्याची (Hardik pandya) माजी पत्नी आणि मॉडेल नताशा स्टँकोविक (Natasa Stankovic Troll) पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. एका फॅशन शोमध्ये सहभागी झाल्यानंतर तिच्या एका कृतीवरून ती सोशल मीडियावर ट्रोल झाली आहे. कारण तिने या फॅशन शोमध्ये तिचा चार वर्षांचा मुलगा अगस्त्य यालाही सोबत नेलं होतं.
शनिवारी झालेल्या एका फॅशन शोमध्ये नताशाने रॅम्पवॉक केला. तिचा लूक आणि आत्मविश्वास जरी चाहत्यांच्या पसंतीस उतरला असला, तरी लहान मुलाला अशा कार्यक्रमात घेऊन जाणं अनेकांना खटकलं. ‘किमान मुलाचा तरी विचार करा’, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी तिच्यावर टीका केली आहे. (Natasa Stankovic Troll)
View this post on Instagram
प्रेक्षकांमध्ये बसलेला मुलगा कंटाळलेला :
या शोमध्ये नताशाचा (Natasa Stankovic Troll) खास मित्र ॲलेक्झांडर ॲलेक्सही उपस्थित होता, जो रॅम्पवॉक दरम्यान मुलाची काळजी घेत होता. अगस्त्य आईसाठी चिअर करताना दिसला, पण काही वेळाने कंटाळल्यासारखा वाटला. एका व्हिडीओमध्ये तो इथे तिथे पाहताना आणि काऊचवर झोपताना दिसत आहे.
या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर काहींनी प्रतिक्रिया देत म्हटलं की, “ही जागा लहान मुलांसाठी नाही, अशा मोठ्या कार्यक्रमांमध्ये त्यांना का आणलं जातं?” काहींनी याला फक्त प्रसिद्धीसाठीचा प्रयत्नही म्हटलं आहे. एकूणच, या प्रकारामुळे नताशा पुन्हा एकदा टीकेच्या केंद्रस्थानी आली आहे.
Natasa Stankovic Troll l मुलाचा संगोपन दोघे मिळून करत असल्याची माहिती :
हार्दिक पांड्या सध्या आयपीएलमध्ये व्यस्त असल्याने मुलगा सध्या आई नताशासोबत अधिक वेळ घालवत आहे. कामातून ब्रेक घेतल्यानंतर नताशाने पुन्हा एकदा मॉडेलिंगमध्ये सक्रिय होण्यास सुरुवात केली आहे. तिने आपल्या आयुष्याला नवा मार्ग दिला आहे. (Natasa Stankovic Troll)
हार्दिक आणि नताशाने जुलै 2024 मध्ये परस्पर संमतीने घटस्फोट घेतला होता. 2020 मध्ये त्यांनी पहिल्यांदा गुपचूप लग्न केलं होतं आणि 2023 मध्ये पुन्हा हिंदू आणि ख्रिश्चन पद्धतीनुसार लग्न केलं. 30 जुलै 2020 रोजी नताशाने पुत्र अगस्त्यला जन्म दिला.








