नताशा स्टँकोविक पुन्हा पडली प्रेमात?, ‘त्या’ व्यक्तीला स्टोरीत केलं टॅग

On: April 11, 2025 12:06 PM
Natasa stankovic
---Advertisement---

Natasa Stankovic l बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल नताशा स्टँकोविक (Natasa Stankovic) पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे. क्रिकेटपटू हार्दिक पांड्याशी घटस्फोट झाल्यानंतर ती तिच्या वैयक्तिक आयुष्याकडे अधिक लक्ष देताना दिसली होती. मात्र, अलीकडेच नताशाने तिच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आणि त्यात “पुन्हा प्रेमात पडणं चांगलं वाटतं” असं लिहित एका खास व्यक्तीला टॅग केलं. यामुळे सोशल मीडियावर पुन्हा एकदा तिच्या नव्या नात्याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

गेल्या वर्षी 18 जुलै 2024 रोजी नताशा स्टँकोविक (Natasa Stankovic) आणि हार्दिक पांड्याचा (hardik pandya) अधिकृतपणे घटस्फोट झाला होता. दोघांचं एक मुलं असून तो दोघेही मिळून सांभाळत आहेत. या घटस्फोटानंतर नताशा वैयक्तिक आयुष्यापासून दूर राहत स्वतःच्या करिअरवर लक्ष केंद्रीत करत होती. पण अलीकडे तिने शेअर केलेल्या पोस्टमुळे पुन्हा तिचं नाव चर्चेत आलं आहे.

स्टोरीमधून नाव उघड? @officiallyvaddy म्हणजे कोण? :

नताशाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये @officiallyvaddy या युजरनेमला टॅग करत ‘पुन्हा प्रेमात पडणं किती सुंदर वाटतं’ असं लिहिलं. त्यामुळे ती कोणाला डेट करत आहे का? असा प्रश्न अनेक चाहत्यांच्या मनात निर्माण झाला. काही माध्यमांनी हा प्रोफाइल अभिनेता रणबीर कपूरचा असल्याचा दावा केला आहे, परंतु याबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

@officiallyvaddy हे एक प्रायव्हेट इंस्टाग्राम अकाउंट असून, यामध्ये कोणतीही स्पष्ट ओळख दिलेली नाही. त्यामुळे हा केवळ प्रमोशनल स्टंट आहे का? की नताशा खरोखरच कोणाच्या प्रेमात आहे, यावर चर्चेला वाव मिळाला आहे. सोशल मीडियावर अनेकांनी “New Love Alert?” म्हणत मीम्स आणि पोस्ट शेअर करायला सुरुवात केली आहे.

Natasa Stankovic l नताशा स्टँकोविक कोण आहे? :

नताशाचा जन्म 4 मार्च 1992 रोजी सर्बियामध्ये झाला. वयाच्या 17 व्या वर्षी तिने नृत्याचे प्रशिक्षण घेतले आणि मॉडेलिंग सुरू केले. प्रकाश झा यांच्या ‘सत्याग्रह’ (2013) या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर ती बिग बॉस सीझन 8 आणि नच बलिए 9 मध्ये झळकली होती. बादशाहच्या ‘डीजे वाले बाबू’ या गाण्यातील तिचा परफॉर्मन्सही खूप गाजला होता.

त्यानंतर तिने फुक्रे रिटर्न्स, झिरो सारख्या चित्रपटांमध्येही काम केलं. काही काळ ती भारतात राहून काम करत होती, पण सध्या ती सर्बियात परत गेल्याचं सांगितलं जात आहे. ती आता कायमची तिथेच स्थायिक होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Natasa Stankovic)

प्रेम की प्रमोशन? चाहत्यांमध्ये उत्सुकता :

नताशाने तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अधिकृतरीत्या काहीही जाहीर केलेलं नसल्याने या नव्या स्टोरीचा उद्देश नक्की काय आहे यावर संभ्रम कायम आहे. काहींना वाटतं की ही केवळ एका नव्या प्रोजेक्टची सुरुवात असू शकते, तर काहींना वाटतं की ती खरंच नव्या नात्यात आहे.

तिच्या सोशल मीडियावर लक्ष ठेवणाऱ्या चाहत्यांनी म्हटलं की, “ती नेहमीच ट्रेंडमध्ये राहते, पण हा स्टोरीचा टॅग फारच खास आहे.” आता नताशा स्वतः पुढे काय सांगते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

News Title: Natasa Stankovic Sparks New Love Rumors After Instagram Story Tagging ‘OfficiallyVaddy’

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now