नाशिक-अक्कलकोट प्रवास सुपरफास्ट होणार! पाहा तुमच्या गावाचं नाव यादीत आहे का?

On: February 25, 2026 1:35 PM
Nashik Akkalkot Expressway
---Advertisement---

Nashik Akkalkot Expressway | बहुचर्चित नाशिक-अक्कलकोट हरितक्षेत्र द्रुतमार्ग प्रकल्पाबाबत महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (National Highways Authority of India) यांनी पुढील दोन वर्षांत हा मार्ग पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले असून जमीन संपादन प्रक्रियेला गती देण्यात आली आहे. त्यामुळे दीर्घकाळ प्रलंबित राहिलेल्या या प्रकल्पाच्या कामकाजाला आता चालना मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. (Greenfield Highway Maharashtra)

जमीन संपादन प्रक्रियेला वेग :

नाशिक जिल्ह्यात उर्वरित १०७.३३ हेक्टर जमीन तातडीने संपादित करण्यासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. बाधित शेतकरी व स्थानिक नागरिकांकडून हरकती आणि सूचना स्वीकारण्यासाठी २१ दिवसांची मुदत जाहीर करण्यात आली आहे. या कालावधीत प्राप्त झालेल्या आक्षेपांची नोंद करून सक्षम अधिकाऱ्यांकडून ठरावीक वेळेत त्यावर निर्णय दिला जाणार आहे. या निर्णयामुळे प्रकल्पाची अंमलबजावणी अधिक पारदर्शक आणि जलद करण्याचा प्रयत्न असल्याचे संकेत मिळत आहेत. (Nashik Akkalkot Expressway)

केंद्र सरकारने सुरुवातीला सूरत ते चेन्नई असा सुमारे १,२०० किलोमीटर लांबीचा हरितक्षेत्र महामार्ग उभारण्याची योजना मांडली होती. मात्र महाराष्ट्रातील काही भागात शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवल्यामुळे संपूर्ण आराखड्याला अडथळे निर्माण झाले. परिणामी सूरत-नाशिक टप्पा रद्द करण्यात आला. त्यानंतर नाशिकपासून दक्षिणेकडील टप्प्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. आडगाव (Adgaon) येथून सुरू होणारा हा मार्ग अहिल्यानगर (Ahilyanagar), धाराशिव (Dharashiv) आणि सोलापूर (Solapur) मार्गे अक्कलकोट (Akkalkot) येथे पोहोचणार आहे.

Nashik Akkalkot Expressway | ३० गावांतून जाणार द्रुतमार्ग :

नाशिक जिल्ह्यातील नाशिक, निफाड आणि सिन्नर या तीन तालुक्यांतील एकूण ३० गावांमधून हा महामार्ग जाणार आहे. या टप्प्यासाठी एकूण ३८७.३३ हेक्टर जमीन आवश्यक असून त्यापैकी सुमारे २८० हेक्टर क्षेत्र आधीच संपादित करण्यात आले आहे. उर्वरित १०७.३३ हेक्टर जमीन हस्तांतरणातील विलंबामुळे प्रकल्पाची गती मंदावली होती. आता नव्याने सुरू झालेल्या प्रक्रियेमुळे अडथळे दूर होण्याची अपेक्षा आहे.

नाशिक तालुक्यातील आडगाव आणि विंचूरगवळी या गावांचा समावेश आहे. निफाड तालुक्यात दारणासांगवी, सावळी, चाटोरी, चेहडी, हेदारणा, लालपाडी, रामनगर, पिंपळगाव निपाणी आणि तळवाले ही गावे येतात. सिन्नर तालुक्यात देशवंडी, पाटपिंपरी, बारनाव पिंपरी, निमगाव सिन्नर, गुळवंच, देवपूर, खोपडी, फर्दापूर, धारणगाव, भोकणी, पांगरी, फुलेनगर, वावी, थोडेवाडी आणि कहांडलवाडी या गावांतून मार्ग जाणार आहे. (Nashik Akkalkot Expressway News)

तसेच सुमारे ३७४ किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पात ७० मीटर रुंदीचा १५२ किलोमीटरचा आणि ६० मीटर रुंदीचा २२२ किलोमीटरचा मार्ग असेल. दऱ्याखोऱ्यांमधून सुमारे ५.६ किलोमीटरचा विशेष भाग तयार केला जाणार आहे. तसेच २७ मोठे पूल आणि १६४ लहान पूल व जोडरस्त्यांचा समावेश असेल. हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर राज्याच्या उत्तर-दक्षिण संपर्काला चालना मिळून औद्योगिक व कृषी वाहतुकीस गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

News title : Nashik Akkalkot Expressway Village List

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now