“मोदी अहंकारी आहेत, ते मुस्लिमांचा द्वेष करत नाही हे त्यांनी पटवून द्यावं”

On: June 12, 2024 4:26 PM
Naseeruddin Shah
---Advertisement---

Naseeruddin Shah | अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुस्लिमांचा द्वेष करत नाहीत हे त्यांनी पटवून देऊ शकले तरी खूप होईल असं नसिरुद्दीन शाह (Naseeruddin Shah )यांनी म्हटलंय. ते एका मुलाखतीत बोलत होते.

मनाला एक प्रकारचे समाधान मिळाले. मग, स्वत:ला सांगितले की पराभूत झालेले, विजयी झालेले, हिंदू-मुस्लिम, सरकार आणि सगळ्यांसाठीच आता आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे, असं नसिरुद्दीन शाह यांनी म्हटलंय.

मोदी अहंकारी आहेत- नसिरुद्दीन शाह

गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदी यांनी मौलवींनी दिलेली टोपी त्यांनी परिधान केली नाही हे विसरणं कठीण असल्याचे त्यांनी म्हटलंय. या मुलाखतीत त्यांनी मुस्लिम कट्टरतावाद्यांनाही फटकारलं.

नसिरुद्दीन शाह म्हणाले की “गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांनी उपोषण केले होते. हे लाक्षणिक उपोषण संपल्यानंतर समाजातील विविध घटकांनी, धर्मगुरुंनी त्यांची भेट घेतली होती. त्यावेळी मुस्लिम धर्मगुरू, मौलवींनी त्यांना जाळीदार टोपी दिली होती. ती परिधान करण्यास मोदींनी नकार दिला होता.

Naseeruddin Shah | “नरेंद्र मोदींना जाळीदार टोपीत पाहायचंय”

मोदींनी जाळीदार टोपी परिधान केली असती तर आम्ही वेगळे नाही असा संदेश गेला असता. मुस्लिमही या देशाचे नागरीक आहेत, त्यांच्यासोबत माझे वैर नाही असं मोदींना दर्शवता आलं असतं.”

हिजाब, सानिया मिर्झाचा स्कर्ट यापेक्षा त्यांनी समाजात शिक्षणाचे प्रमाण कसे वाढेल, याची काळजी करावी असंही शहा यांनी म्हटलं.

महत्त्वाच्या बातम्या- 

बुलढाण्यात मोठी दुर्घटना; वादळी वाऱ्यामुळे झोक्यात झोपलेली चिमुकलीही पंत्र्यांसोबत उडाली

“भारतीयांनी आळशी होऊ नये, देश अजूनही..”; कंगना रनौतचं मोठं आवाहन

देशातील प्रथम महिला IPS अधिकारी किरण बेदी यांच्या बायोपिकची घोषणा!

“मी त्याचा फोन उचलला नाही की तो मला शारीरिक…”,ऐश्वर्या रायने केला खुलासा

बाहेर पडताना काळजी घ्या! ‘या’ भागांत वादळी वाऱ्याचा पाऊस होणार

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now