राष्ट्रवादीत मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; ‘हा’ नेता अजित पवार गटात परतणार

On: February 22, 2025 2:13 PM
Maharashtra politics
---Advertisement---

Ajit Pawar l राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे नेते नरेंद्र राणे (Narendra Rane) परतीच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी अजित पवार (Ajit Pawar) गटाला सोडचिठ्ठी देत शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. मात्र, तिथे त्यांना मन रमले नसल्याची चर्चा आहे आणि आता ते पुन्हा अजित पवार गटात परतण्याच्या तयारीत आहेत.

सुनील तटकरे यांची भेट, पुनरागमनाच्या चर्चांना उधाण :

नरेंद्र राणे आणि त्यांचे भाऊ दिनकर तावडे (Dinkar Tawde) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांची भेट घेतली. मुंबईत प्रदेश कार्यालयात झालेल्या या बैठकीमुळे त्यांच्या पक्षपरिवर्तनाच्या चर्चांना अधिकच जोर आला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी हे मोठे राजकीय नाट्य घडत आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, राणे यांना पक्ष प्रवेशाबाबत काही पदाधिकाऱ्यांचा विरोध आहे. त्यामुळे त्यांची पुनरागमनाची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. त्यांच्यासोबत आणखी ४ पदाधिकारीही परतण्याच्या तयारीत आहेत.

नरेंद्र राणे यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार यांच्या गटात बंडखोरी करत शरद पवार गटात प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांच्या या निर्णयामुळे अजित पवार गटाला धक्का बसेल आणि शरद पवार गट बळकट होईल, असे मानले जात होते. मात्र, विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाल्याने आता स्वगृही परतणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.

Ajit Pawar l राजकीय समीकरणे बदलणार? :

या हालचालीमुळे मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठे राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. जर नरेंद्र राणे आणि त्यांचे सहकारी पुन्हा अजित पवार गटात गेले, तर शरद पवार गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

News title : Narendra Rane Likely to Return to Ajit Pawar’s NCP

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now