ठरलं! 9 जूनला नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची घेणार शपथ

Narendra Modi | अवघ्या देशाचं लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे लक्ष लागलं होतं. 04 जून हा दिवस देशातील सर्वांसाठी महत्त्वाचा दिवस
ठरला. या दिवशी निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि भाजपला महाराष्ट्रात मोठा धक्का बसला.

NDA च्या 292 जागा आल्या असून INDIA आघाडीच्या 234 जागा निवडून आल्या. मात्र, सध्या चर्चा आहे ती यंदा पंतप्रधानपदाची (Narendra Modi) शपथ कोण घेणार याची. दरम्यान, 09 जूनला नरेंद्र मोदीच पंतप्रधानपदाची शपथ घेणार असल्याची माहिती भाजपच्या जेष्ठ नेत्यांनी एनडीएच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत दिली.

तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार?

09 जून रोजी नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान (Narendra Modi) होणार आहेत. 09 तारखेला सायंकाळी 06 वाजता मोदींचा शपथविधी सोहोळा पार पडणार आहे. भाजपचे जेष्ठ नेते प्रल्हाद जोशी यांनी ही माहिती दिली आहे. शपथविधी सोहळ्यापूर्वी NDA आघाडीच्या नवनिर्वाचित खासदारांची जुन्या संसदेत बैठक पार पडली. यावेळी NDA आघाडीचे खासदार, मुख्यमंत्र्यांसह युतीचे वरिष्ठ नेत्यांनी या बैठकीला हजेरी लावली.

पुढे काय घडलं?

या बैठकीत भाजप अध्यक्ष जेपी नड्डा मोदींच्या नेतृत्वाच्या समर्थनार्थ ठराव मांडण्याची अपेक्षा आहे, मित्रपक्ष आणि खासदारांनी त्यास अनुमोदन देण्याची शक्यता आहे. पंतप्रधान तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत.

दरम्यान, पंडित जवाहरलाल नेहरु देखील एकमेव पंतप्रधान होते. नेहरुंची देखील तिन वेळा पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आली होती. मात्र आता निवडणुकीच्या निकालानंतर नरेंद्र मोदी सलग तीनवेळा निवडून येणारे पंतप्रधान होणारे देशाचे दुसरे पंतप्रधान ठरतील.

News Title : Narendra Modi to take swear of Prime Minister

महत्त्वाच्या बातम्या-

सुप्रिया सुळेंनी विजयानंतर गाठले अजितदादांचे घर; चर्चांना पुन्हा आले उधाण

“चंद्राबाबू आणि नितीशकुमार आज तिकडे तर उद्या आमच्याकडे..”; ‘या’ खासदाराचा खळबळजनक दावा

मोठी बातमी! अजित पवार गटाच्या नेत्याला ईडीकडून दिलासा

“देवेंद्र फडणवीस छोटा राजन आणि नरेंद्र मोदी…”; संजय राऊतांची जहरी टीका

निकालानंतर महायुतीतील वाद चव्हाट्यावर; शिवसेना नेत्याचा भाजप नेत्याला गंभीर इशारा