Narendra Modi Oath Taking Ceremony | सलग तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत. राष्ट्रपती भवनात हा शपथविधी सोहळा पार पडत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली आहे.
राजनाथ सिंह यांनी देखील कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. मोदी यांच्यानंतर राजनाथ सिंह यांनी शपथ घेतली. तसेच नितीन गडकरी यांनी देखील कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली आहे.
राजनाथ सिंह, अमित शहा, नितीन गडकरींनी घेतली शपथ
नितीन गडकरी हे तीनवेळा नागपूरमधून निवडून आलेले आहेत. 2014, 2019 या मोदी सरकारमध्ये मंत्री होते. गडकरी हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष देखील राहिलेले आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रिपद नितीन गडकरी यांनी सांभाळलेलं आहे.
‘रोडकरी’ अशी नितीन गडकरी यांची ओळख आहे. देशातील रस्त्यांचं जाळ विस्तारण्यात नितीन गडकरी यांचा मोठा वाटा राहिला आहे. बई-पुणे द्रुतगती महामार्गासह अनेक नवीन रस्ते नितीन गडकरी यांच्या मंत्रिपदाच्या काळात झालेले आहेत.
शपथविधी सोहळ्या दिग्गज उपस्थित
पंतप्रधान मोदींनंतर राजनाथ सिंह यांनी दुसऱ्य क्रमांकावर, अमित शाह यांनी तिसऱ्या क्रमांकावर तर, नितीन गडकरी यांनी चौथ्या नंबरवर शपथ घेतली. तर, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी पाचव्या नंबरवर मंत्रीपदाची शपथ घेतली. मोदी 2.0 सरकारमध्ये अमित शाह यांच्याकडे गृहखाते होते, तर राजनाथसिंह यांच्याकडे संरक्षण मंत्रालय होते.
नितीन गडकरी भूपृष्ठ आणि रस्ते वाहतूक मंत्रिपदाचा पदभार सांभाळत होते. यापूर्वी 10 वर्षे त्यांनी या खात्याचा पदभार सांभाळला आहे. त्यामुळे, मोदी 3.0 सराकरमध्ये गृह आणि अर्थ खाते कोणाच्या वाट्याला येणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. दरम्यान, या शपथविधी सोहळ्यासाठी अनेक दिग्गजांची मांदियाळी पाहायला मिळाली.
महत्त्वाच्या बातम्या-
‘मैं नरेंद्र दामोदरदास मोदी…’; सलग तिसऱ्यांदा नरेंद्र मोदींनी घेतली पंतप्रधानपदाची शपथ
भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचं मोठं वक्तव्य, म्हणाला…
“थोडे दिवस धीर ठेवू, सर्वांना एकमेकांची गरज”; प्रफुल्ल पटेल यांचं मोठं वक्तव्य
“मस्ती आहे का?,ज्या दिवशी नरड्याला लागेल..”; मनोज जरांगेंचा नाव न घेता धनंजय मुंडेंना इशारा
गर्भवती महिलेला कारने दिली धडक, भयंकर अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर






