‘मैं नरेंद्र दामोदरदास मोदी…’; सलग तिसऱ्यांदा नरेंद्र मोदींनी घेतली पंतप्रधानपदाची शपथ

On: June 9, 2024 8:29 PM
Narendra Modi Oath Taking Ceremony
---Advertisement---

Narendra Modi Oath Taking Ceremony | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे. सलग तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत. राष्ट्रपती भवनात हा शपथविधी सोहळा पार पडत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली आहे.

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत राष्ट्रपती भवन परिसरात नरेंद्र मोदी यांचा शपथविधीचा शाही सोहळा पार पडला. या सोहळ्याला देशभरातील विविध क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली होती. तसेच परदेशातील मंत्रीही या सोहळ्याला उपस्थित राहिलेले बघायला मिळालं.

नरेंद्र मोदींनी घेतली पंतप्रधानपदाची शपथ

जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशातील सर्वात मोठा सोहळा पार पडतो आहे. या कार्यक्रमाकडे जगाचं लक्ष आहे. या कार्यक्रमाला 7000 लोकांना निमंत्रण देण्यात आलं आहे. जगभरातील दिग्गज लोक उपस्थित आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मंत्र्यांच्या शपथ विधी सुरू होताच नितीन गडकरींच्या नागपुरात जल्लोष केला गेला. चौकात मोठा स्क्रीन लावून शपथविधी कार्यक्रम पहिला जात आहे. कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी गर्दी केलीये.

ठिकठिकाणी कार्यकर्त्यांचा जल्लोष

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीच्या निमित्ताने ठिकठिकाणी भाजपकडून जल्लोष केला जात आहे. रत्नागिरीत ढोल ताशांच्या गजरात आनंदोत्सव साजरा होतोय. नरेंद्र मोदी यांचा शपथविधी पाहण्यासाठी शहरातील मारुती मंदिर परिसरात एलईडी स्क्रीन लावण्यात आल्या आहेत. मोठ्या संख्येने रत्नागिरी जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी जल्लोषात सामील झाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

गर्भवती महिलेला कारने दिली धडक, भयंकर अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर

राष्ट्रवादीला एकही मंत्रीपद नाही?; देवेंद्र फडणवीसांनी सांगितली अडचण

‘पंकजा मुंडेंना कॅबिनेटमंत्री करा’; बीडमध्ये झळकले बॅनर्स

मंत्रीपदासाठी अजित पवार गट अजूनही वेटिंगवरच?; समोर आलं मोठं कारण

‘सगळ्याचं श्रेय पुणेकरांना…’, मंत्रीपदाबाबत बोलत असताना मोहोळ भावूक

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now