मंत्रीपदासाठी अजित पवार गट अजूनही वेटिंगवरच?; समोर आलं मोठं कारण

Narendra Modi Cabinet | नरेंद्र मोदी आज दिल्लीत तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. मोदींच्या मंत्रीमंडळात महाराष्ट्रातील 6 जणांना संधी मिळाली आहे. यामध्ये शिंदे गटाच्या एका खासदाराचा समावेश आहे. पण, अजित पवार गटाला एकही मंत्रीपद मिळणार नसल्याची सध्या जोरदार चर्चा आहे.

यासंदर्भात सुनील तटकरेंच्या घरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट देखील दिली होती. राष्ट्रवादीच्या नेत्यांची फडणवीसांकडून समजूत काढण्याचे प्रयत्न झाल्याची चर्चा आहे. पाहायला गेलं तर, अद्याप याबाबत अधिकृत अशी कोणतीच माहिती समोर आलेली नाहीये. पण, सकाळपासूनच अजित पवार गट चर्चेत आहे.

अजित पवार गट अजूनही वेटिंगवर?

राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिल्लीत तळ ठोकूनही त्यांना संधी देण्यात आली नाही. अजित पवार गटाकडून सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल इच्छुक उमेदवार होते. मात्र प्रफुल पटेल यांच्या (Narendra Modi Cabinet ) नावाची जोरदार चर्चा होती. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नेत्यांच्या दिल्लीत पार पडलेल्या बैठकीत प्रफुल पटेल यांच्या नावावर राष्ट्रवादीकडून शिक्कामोर्तबही करण्यात आलं होतं.

सकाळी महाराष्ट्रातून ज्यांना संधी देण्यात आली, त्यांना फोन करण्यात आले. पण, राष्ट्रवादीला अद्यापही फोन आला नसल्याची माहिती आहे. एकीकडे शिंदे यांच्या शिवसेनेचे सात खासदार असूनही त्यांना केवळ 1 राज्यमंत्रीपद मिळत आहे. तर, केवळ 1 खासदार असलेल्या राष्ट्रवादीला कॅबिनेट कसं द्यायचं?, याबाबत प्रश्न निर्माण झाल्याचं समोर आलंय.

महाराष्ट्रातून कुणाला मिळाली संधी?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही इच्छुक नेते हे वरिष्ठ असल्याने राज्यमंत्रीपद देण्यात देखील महायुतीला अडचणी येत आहेत. त्यातच अजून एक चर्चा होते आहे. जर राष्ट्रवादीला संधी दिली गेली तर इतर पक्ष नाराज होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण, देशात 1 सदस्य निवडून आलेले 7 पक्ष (Narendra Modi Cabinet ) आहेत.

आता पुढे याबाबत काय होतं, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. दरम्यान, महाराष्ट्रातून भाजपचे खासदार मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसे, शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांना पहिल्यांदाच संधी दिली आहे. तर, नितीन गडकरी, पीयूष गोयल, रामदास आठवले यांचाही मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे.

News Title- Narendra Modi Cabinet Ajit Pawar faction position

महत्त्वाच्या बातम्या-

मोदींच्या मंत्रिमंडळात नारायण राणेंना डच्चू, भागवत कराडांचाही पत्ता कट

सुनेला केंद्रीय मंत्रिपदासाठी फोन, एकनाथ खडसे झाले भावूक, म्हणाले…

मोदी मंत्रिमंडळात कोण कोण?; फायनल यादी आली समोर

मोठी बातमी! राज्यात पुढील 48 तास अतिवृष्टीचा इशारा; हायअलर्ट जारी

“वादा तोच दादा नवा”; बारामतीत झळकले अजित पवारांना डिवचणारे बॅनर्स