मंत्रिपदाची हंडी फुटली!, महाराष्ट्रातील ‘या’ 5 नेत्यांना मंत्रिपदासाठी आले फोन

Narendra Modi Cabinet | नरेंद्र मोदी आज 9 जूनरोजी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. दिल्लीत शपथविधीसाठी भव्य तयारी करण्यात आली आहे. अशात एनडीए सरकारमध्ये कोणाकोणाची वर्णी लागणार?, याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. त्यात महाराष्ट्रातील कुणा-कुणाला मंत्रिपद दिलं जाणार, याबाबत आता मोठी माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्रामधून पाच जणांना मंत्रिपद जवळपास निश्चित झालं असल्याची माहिती समोर येत आहे. ज्यांचा समावेश झालाय, त्यांना दिल्लीतून फोन केले जात आहेत. यामध्ये (Narendra Modi Cabinet ) महाराष्ट्रातून आतापर्यंत भाजपचे नितीन गडकरी, पियुष गोयल आणि उत्तर महाराष्ट्रातून रक्षा खडसे यांना मंत्रीपदाची संधी देण्यात आली आहे.

अजित पवार अजूनही वेटिंगवर

तर, आरपीआयकडून रामदास आठवले यांना तिसऱ्यांदा मंत्रीपदाची (Narendra Modi Cabinet ) संधी देण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे.आता यामध्ये शिंदे आणि अजित पवार गट यांच्यातील कुणा-कुणाला संधी दिली जाणार, याबाबत सर्वांचं लक्ष लागून होतं.

काही मीडिया रिपोर्टनुसार, शिंदे गटाकडून प्रतापराव जाधव यांना मंत्रि‍पदासाठी फोन केला असल्याचं म्हटलं जातंय. दुसरीकडे अजित पवार गटाकडून प्रफुल पटेल यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. त्यातच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिल्लीत तळ ठोकला आहे.पण, अजूनही त्यांच्यात कुणालाही मंत्रिपदाबाबत फोन आलेला नाही.

मोदींच्या मंत्रिमंडळात कुणाला मिळणार स्थान?

त्यामुळे शिंदे गटाला तर जागा मिळाली पण, अजित पवार गट अजूनही वेटिंगवर असल्याचे चित्र आहे. दरम्यान, टीडीपीने आपल्या गटातील मंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. TDP नेते जयदेव गल्ला यांनी एक्सवर पोस्ट केले की, त्यांच्या पक्षाला मोदी 3.0 मंत्रिमंडळात कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपद मिळाले आहे. तीन वेळा खासदार (Narendra Modi Cabinet )असलेले राम मोहन नायडू हे टीडीपी कोट्यातून नव्याने स्थापन झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री असतील आणि पी चंद्रशेखर पेम्मासानी हे राज्यमंत्री असतील.

महाराष्ट्रातील ‘या’ नेत्यांना आले फोन

महाराष्ट्रातील जवळपास 6 नेत्यांना फोन आल्याची (Narendra Modi Cabinet )माहिती आहे. त्यात नितीन गडकरी, पीयूष गोयल, रक्षा खडसे, प्रतापराव जाधव, रामदास आठवले आणि मुरलीधर मोहोळ यांच्या नावाचा समावेश असल्याची माहिती आहे.

News Title-  Narendra Modi Cabinet

महत्वाच्या बातम्या-

‘या’ राशीच्या व्यक्तींचं आज भाग्य उजळणार, नव्या संधी आयुष्य बदलतील

लहान मुलांमधील लठ्ठपणा ठरू शकतो धोकादायक; काय काळजी घ्याल?

राज्यात मॉन्सून दाखल, शेतकऱ्यांनी पेरणी कधी करावी?, हवामान विभागाकडून महत्वाचा सल्ला

“देवेंद्र फडणवीस पळणारा माणूस नाही, मी निराश झालो असं समजू नका”

मोठी बातमी! बच्चू कडू यांचा महायुतीला धक्का, घेतला सर्वात मोठा निर्णय