मोदींच्या मंत्रिमंडळात नारायण राणेंना डच्चू, भागवत कराडांचाही पत्ता कट

Narendra Modi Cabinet | दिल्लीत सत्तास्थापन करण्यासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. नरेंद्र मोदी आज 9 जूनरोजी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. नरेंद्र मोदी यांच्यासह कॅबिनेट आणि राज्यमंत्रिपदासाठी काही खासदार शपथ घेणार आहेत.

ज्यांना मंत्रीमंडळात स्थान मिळालंय त्या खासदारांना पंतप्रधान कार्यालयातून फोन करण्यात (Narendra Modi Cabinet) येत आहेत. यामध्ये महाराष्ट्रातून 6 जणांना फोन करण्यात आले आहेत. मात्र, ‘मोदी सरकार 2.0’ मंत्रिमंडळात असलेल्या राज्यातील दोन नेत्यांना यावेळी मोठा धक्का बसला आहे.

नारायण राणे, भागवत कराड यांना डच्चू

मोदींच्या तिसऱ्या टर्ममध्ये भाजपचे नारायण राणे आणि भागवत कराड यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. भाजप हायकमांडकडून राणे आणि कराड यांना फोन करून मंत्रीमंडळात सहभागी करून घेता येणार नसल्याचं सांगण्यात आलंय.

‘मोदी सरकार 2.0’ मध्ये नारायण राणे एमएसएमई मंत्री होते तर कराड अर्थ राज्यमंत्री होते. त्यांना यंदा मंत्रिमंडळात संधी देण्यात आली नाही. परंतु महाराष्ट्रातून भाजप आणि शिंदे (Narendra Modi Cabinet) गटातील नेत्याला मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे.

महाराष्ट्रातील ‘या’ खासदारांना मिळालं मंत्रीपद

महाराष्ट्रातून भाजपचे खासदार मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसे, शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांना पहिल्यांदाच संधी दिली आहे. तर, नितीन गडकरी, पीयूष गोयल, रामदास आठवले यांचाही मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे.

पंतप्रधान यांच्या निवासस्थानी आतापर्यंत बऱ्याच नेत्यांनी (Narendra Modi Cabinet) हजेरी लावली आहे. त्यातील कही जण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. महाराष्ट्रातून मंत्र्यांना स्थान देण्यात जातीय गणितही लक्षात घेतल्याचं दिसून येतंय.

अर्थातच नितीन गडकरी (ब्राम्ह्यण), प्रतापराव जाधव (मराठा) यांना संधी मिळाली आहे. तर, उत्तर महाराष्ट्रातून ओबीसी चेहरा रक्षा खडसे यांना संधी दिली आहे. पश्चिम महाराष्ट्रातून मुरलीधर मोहोळ (मराठा चेहरा) तर मुंबईतून गुजराती चेहरा पियूष गोयल यांना संधी दिली आहे. तर, शेड्युल कास्टमधून रामदास आठवले यांना संधी दिली आहे.

News Title- Narayan Rane and Bhagwat Karad Dropped From Narendra Modi Cabinet

महत्त्वाच्या बातम्या-

सुनेला केंद्रीय मंत्रिपदासाठी फोन, एकनाथ खडसे झाले भावूक, म्हणाले…

मोदी मंत्रिमंडळात कोण कोण?; फायनल यादी आली समोर

मोठी बातमी! राज्यात पुढील 48 तास अतिवृष्टीचा इशारा; हायअलर्ट जारी

“वादा तोच दादा नवा”; बारामतीत झळकले अजित पवारांना डिवचणारे बॅनर्स

“जो मराठा समाजाला त्रास देणार त्याला विधानसभेत…”, मनोज जरांगेंची तोफ कडाडली