‘माझा नवरा तिसऱ्यांदा…’, आदिलबाबत राखीचा मोठा खुलासा

On: February 10, 2023 6:29 PM
rakhi sawant
---Advertisement---

मुंबई | बाॅलिवूड(Bollywood) अभिनेत्री राखी सावंत(Rakhi Sawant) सध्या तिच्या वैवाहिक आयुष्यामुळं अडचणीत आली आहे. राखीनं तिच्या पतीवर म्हणजेच आदिल खानवर(Adil Khan) एक्स्ट्रा मॅरेटीयलचा आरोप केला आहे. त्यामुळं आदिलची चौकशी होत अंधेरी न्यायालयानं आदिलला कोठडी सुनावली आहे.

आदिल कोठडीत असला तरी राखीनं इकडं मीडियासमोर आदिलबाबत अनेक खुलासे केले आहेत. आदिलनं आपले न्यूड व्हिडीओ काढून काहींना विकले असल्याचा आरोपही राखीनं केला आहे.

राखी ई टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली की, मला सोडून आदिल तनू नावाच्या मुलीसोबत तिसऱ्यांदा लग्न करण्याच्या तयारीत आहे. त्यानं मला वचन देऊन, शपथ देऊनसुद्धा माझी फसवणूक केली आहे. त्यानं मला मानसिक आणि शारीरिक त्रास दिला असल्याचंही राखीनं सांगितलं आहे.

आईच्या उपचारावेळी आदिलनं माझे घेतलेले पैसे वेळेत परत न दिल्यानं आईचा मृत्यू झाला आहे. आदिलनं तिच्याकडून दीड कोटी रूपये घेतले आहेत, असंही राखीनं सांगतिलं आहे.

दरम्यान, राखीनं गेल्याच महिन्यात आदिलसोबत कोर्ट मॅरेज केल्याचे सांगितलं होतं. त्यावेळीही आदिल हे लग्न मान्य करण्यास तयार नव्हता. राखीनं बराच गोंधळ घातल्यानंतर आदिलनं या लग्नाची कबुली दिली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

Join WhatsApp Group

Join Now