मराठा आंदोलनामुळे मुंबईतील वाहतुकीत बदल! ‘हे’ महत्वाचे मार्ग बंद राहणार

On: September 1, 2025 9:44 AM
Pune Traffic Diversion
---Advertisement---

Mumbai Traffic Diversion | मुंबईत मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj jarange patil) यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाचा परिणाम वाहतुकीवर झाला आहे. ओबीसी आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी जरांगे पाटील आझाद मैदानात उपोषणाला बसले आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने आंदोलक सीएसएमटी आणि पालिकेसमोर जमले आहेत. वाढत्या गर्दीमुळे आणि सुरक्षेच्या कारणास्तव वाहतूक पोलिसांनी अनेक महत्त्वाचे मार्ग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

सीएसएमटी परिसरातील वाहतुकीवर निर्बंध :

आंदोलनामुळे मुंबई सीएसएमटी आणि पालिकेकडे येणारे सर्व प्रमुख मार्ग बंद करण्यात आले आहेत. जे.जे. उड्डाणपुलावरून येणाऱ्या वाहनांना मुंबई पोलिस आयुक्तालय मार्गे मेट्रो जंक्शन किंवा चर्चगेट स्थानकाच्या दिशेने वळवले जात आहे. तसेच आझाद मैदानाच्या मुख्यद्वाराजवळील मुंबई महानगरपालिका मार्ग व हजारीमल सोमानी रोड (फॅशन स्ट्रीट ते सीएसएमटी) हे दोन्ही मार्ग बंद ठेवण्यात आले आहेत. (Mumbai Traffic Diversion)

याशिवाय हुतात्मा चौकाहून सीएसएमटीकडे जाणारा मार्ग तसेच मंत्रालयासमोरील मॅडम कामा रोड ते मरीन ड्राईव्ह जंक्शन या महत्त्वाच्या रस्त्यांवरही वाहतूक बंद करण्यात आली आहे. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून आंदोलकांमुळे बंद असलेला फ्री वे आता पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

Mumbai Traffic Diversion | पोलिसांची वाढीव कुमक तैनात :

मोठ्या प्रमाणावर आंदोलक जमल्याने वाहनांच्या लांबलचक रांगा सीएसएमटी व आझाद मैदान परिसरात दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. आझाद मैदान वाहतूक पोलिसांना ३५ आणि वडाळा वाहतूक पोलिसांना ३५ अशी एकूण ७० जणांची वाढीव कुमक देण्यात आली आहे. यामुळे आझाद मैदान, मरीन ड्राईव्ह, पायधुनी आणि वडाळा वाहतूक पोलिसांवर अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली आहे. (Mumbai Traffic Diversion)

सध्या जरांगे पाटील यांचे उपोषण चौथ्या दिवशी पोहोचले आहे. आंदोलकांची वाढती गर्दी आणि वाहतुकीतील गोंधळ लक्षात घेऊन पोलिस प्रशासन नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करत आहे.

News Title: Mumbai Traffic Update: Roads Closed Due to Maratha Reservation Protest at Azad Maidan

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now