मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, ‘हा’ रस्ता 6 महिन्यांसाठी बंद

On: February 10, 2025 1:09 PM
Mumbai-Pune Expressway
---Advertisement---

Mumbai-Pune Expressway l तुम्ही जर मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरून (Mumbai-Pune Expressway) प्रवास करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळ कळंबोली जंक्शनची सुधारणा करणार आहे. त्यामुळे कळंबोली सर्कलजवळील (Kalamboli Circle) वाहतूक कोंडी टाळण्यासाठी, यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील (Yashwantrao Chavan Mumbai-Pune Expressway) मुंबई वाहिनीवरील पनवेल एक्झिट 11 फेब्रुवारीपासून पुढील 6 महिने बंद ठेवण्यात येणार आहे.

पर्यायी मार्गाचा अवलंब करावा

या कामामुळे कळंबोली सर्कल येथे नव्याने उड्डाणपूल (Flyover) आणि भुयारी मार्गाचे (Underpass) काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे, वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा.

Mumbai-Pune Expressway l पर्यायी मार्ग

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून पनवेल (Panvel), गोवा (Goa), जेएनपीटीकडे (JNPT) जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांनी: कोनफाटा (Konphata) (कि.मी. 9.600) येथे डावीकडे वळण घेऊन, एनएच 48 मार्गावरून (NH 48) पळस्पे सर्कल (Palaspe Circle) येथून इच्छितस्थळी जावे.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून (पनवेल एक्झिट) तळोजा (Taloja), कल्याण-शिळफाट्याकडे (Kalyan-Shilphata) जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांनी: सरळ पनवेल सायन महामार्गावरून (Panvel Sion Highway) पुरुषार्थ पेट्रोलपंप उड्डाण पुलाखालून (Purusharth Petrol Pump Flyover) उजवीकडे वळण घेऊन रोडपाली (Roadpali) येथून एनएच 48 महामार्गावरून इच्छितस्थळी जावे.

वाहतूक कोंडीची शक्यता:

पनवेल एक्झिट बंद राहणार असल्याने लहान आणि मोठी वाहने, तसेच मालवाहू ट्रक (Trucks) यांना याचा अधिक परिणाम जाणवण्याची शक्यता आहे. विशेषतः पनवेल, मुंब्रा (Mumbra) आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टकडे (Jawaharlal Nehru Port Trust) जाणाऱ्या वाहनांना फटका बसणार आहे.

वाहतूक व्यवस्थापनासाठी (Traffic Management) अधिकाऱ्यांनी पर्यायी मार्ग सुचवले आहेत. नवी मुंबई वाहतूक विभागाचे  पोलीस उपआयुक्त तिरुपती काकडे (Tirupati Kakade) यांनी याबाबतचे नोटिफिकेशन जाहीर केले आहे.

News Title : Mumbai-Pune Expressway: Panvel Exit to Remain Closed for 6 Months

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now