मुंबई पोलिसांसाठी सरकारने घेतला मोठा निर्णय; सरकारकडून दिली जाणार ‘ही’ सुविधा

On: October 11, 2025 7:12 PM
Mumbai Bomb Threat
---Advertisement---

Mumbai Police। मुंबई म्हंटल की सर्वात आदराने आणि जबाबदारीने घेतलं जाणारं नाव म्हणजे मुंबई पोलीस. मुंबई पोलीस नेहमीच आपल्या कामगिरीसाठी चर्चेत असतात. दरम्यानच सरकारने पोलिसांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एक निर्णय घेतला आहे. दिवसभर काम केल्यानंतर घरी जाण्यासाठी लागणारे ट्राफिक आणि जवळपास २-३ तासांचा प्रवास यामुळे मुंबई पोलिसांचा बराच वेळ जातो. मुंबई पोलिसांची ही अडचण दूर व्हावी यासाठी सरकार कामाला लागल आहे. पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या अंमलदार आणि अधिकाऱ्यांना मुंबई शहरातच सरकारी घरं देण्यासाठी सरकारने विचार सुरु केला आहे. (Mumbai Police Home)

अंमलदार ते वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसाठी घरं बांधली जाणार! :

या प्रकल्पासाठी मुंबईत ७५ भूखंडांचा वापर केला जाणारं असून, अंमलदार ते वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसाठी घरं बांधली जाणार आहे. या प्रकल्पाला ‘पोलीस हाऊसिंग टाउनशिप प्रकल्प’ असे नाव देण्यात येणार आहे. यासाठी एका समितीची स्थापना देखील केली गेली आहे. या प्रकल्पाअंतर्गत ४५० ते ६०० चौरस फुटांची घरे सोयीसुविधांसोबत बांधली जाणार आहे.

सणवार असो वा रविवार, राष्ट्रीय सुट्टी असो किंवा मग आंदोलनं, ५१ हजार ३०८ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी नेहमी मुंबईच्या सुरक्षेसाठी कार्यरत असतात. पोलिसांचा हा ताण कमी व्हावा त्यासाठी त्यांचे कर्तव्याचे तास कमी करावे, अशी मागणी केली जात होती. पोलीस जवळपास पोलीस ठाण्यात १०-१२ तास काम करतात. आणि मुंबई मधल्या ट्रॅफिकला सामोरे जाऊन मुंबई बाहेर कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, पनवेल,विरार अशा भागात पोलिसांना जावं लागत. यासगळ्यात २-३ तास आरामात जातात. (Mumbai Police Home)

मात्र आता दररोज होणारी अडचण त्याचबरोबर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आला अथवा एखादी नैसर्गिक आपत्ती आल्यास पोलिसांना घरी जाता येत नाही. त्यामुळे मुंबई शहरातच पोलिसांना घरं मिळावी अशी मागणी केली जात होती. शुक्रवारी यावर निर्णय घेण्यात आला आहे.

Mumbai Police। पोलीस ठाण्याच्या आवारातच घरं उपलब्ध करण्यात येणार :

गृहविभाग हा प्रकल्प राबणार आहे. याअंतर्गत पोलीस ठाण्याच्या आवारातच घरं उपलब्ध करण्यात येणार आहेत. पोलिसांच्या आधीच्या २० वसाहती जुन्या झाल्या आहेत. त्यामुळे आत ७५ भूखंडाचा वापर करून सरकार हा प्रकल्प सुरु करणार आहे. ३-४ वर्षात हा प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता आहे.

Title – Government Project for Mumbai Police  

Join WhatsApp Group

Join Now