मुंबई म्हाडाच्या 2030 घरांची आज सोडत, घर मिळालं की नाही ते ‘असं’ करा चेक

On: October 8, 2024 8:17 AM
Mumbai MHADA Lottery 2024
---Advertisement---

Mumbai MHADA Lottery 2024 | आज 8 ऑक्टोबररोजी मुंबई म्हाडाच्या 2030 घरांची सोडत जाहीर होणार आहे. म्हाडाने मुंबई मंडळासाठी 2030 घरांसाठी सोडत प्रक्रिया राबवली होती. या सोडतीचा आज निकाल जाहीर केला जणार आहे. या सोडत प्रक्रियेचे थेट प्रक्षेपण देखील पाहता येणार आहे. या घरासाठी एक लाखांहून अधिक अर्ज करण्यात आले होते. (Mumbai MHADA Lottery 2024)

आज 1 लाख 13 हजार अर्जदारांपैकी भाग्यवंत 2030 जणांचे मुंबईतील घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. मुंबईतील नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे सकाळी 10.30 वाजता सोडतीचा निकाल जाहीर होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ही सोडत जाहीर केली जाणार आहे.

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार व अतुल सावे उपस्थित राहणार आहेत. या सोडतीमध्ये गोरेगाव, मालाड, जुहू, दादर, वरळी, ताडदेव, वडाळा, कन्नमवार नगर, पवाई यासह अन्य ठिकाणच्या घरांचा समावेश आहे.(Mumbai MHADA Lottery 2024)

म्हाडाने 9 ऑगस्ट ते 19 सप्टेंबर 2024 या काळात सोडत प्रक्रिया राबवली होती. त्यानंतर या सोडतीसाठी एकूण 1 लाख 13 हजार 811 जणांनी अर्ज केला होता. मात्र यापैकी 269 अर्ज वेगवेगळ्या कारणांमुळे बाद झाले होते. आता यापैकी कुणाला घर मिळणार, ते आज समजेल.

सोडतीचा लाईव्ह कार्यक्रम कुठे पाहणार?

अर्जदारांना ‘वेबकास्टिंग’ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सोडतीच्या कार्यक्रमाचे घरबसल्या थेट प्रक्षेपण बघण्याची सुविधा करण्यात आली आहे. हा कार्यक्रम म्हाडाच्या @mhadaofficial या युट्यूब चॅनल व फेसबूक पेजवर पाहता येणार आहे. (Mumbai MHADA Lottery 2024)

घर मिळालं की नाही ते कसं समजणार?

सोडतीचे थेट प्रक्षेपण वेबकास्टिंगद्वारे करण्यात येणार असून नागरिकांना अल्पावधीतच सोडतीचा निकाल जाणून घेता येणार आहे. सोडतीमधील विजेत्या अर्जदारांची यादी म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या वेबसाईटवर सायंकाळी 6.00 वाजता प्रसिद्ध केली जाणार आहे. यासोबतच विजेत्या अर्जदारांना एसएमएसद्वारेही माहिती दिली जाईल. (Mumbai MHADA Lottery 2024)

News Title : Mumbai MHADA Lottery 2024

महत्वाच्या बातम्या-

नवरात्रीचा आज सहावा दिवस, देवी कात्यायनी ‘या’ राशींवर धरणार कृपेचे छत्र!

रेल्वे विभागात नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

… तर त्यांना जाळ्या नसलेल्या इमारतींवरून उड्या मारायला लावल्या पाहिजेत; राज ठाकरेंचा टोला

आम्ही कुठेही पोरी देत नसतो; शरद पवार असं का म्हणाले?

अभिजीत गेम हरला, तरीही मिळाले सुरज पेक्षा जास्त पैसे; आकडा पाहून व्हाल थक्क

Join WhatsApp Group

Join Now