MS Dhoni Out or Not l आयपीएल 2025 मध्ये 683 दिवसांनंतर एमएस धोनीने कर्णधार म्हणून पुनरागमन केलं. पण चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामन्यात त्याचा वादग्रस्त बाद होणं चर्चेचा विषय ठरलं आहे. थर्ड अंपायरच्या निर्णयावरून वाद निर्माण झाला असून चाहत्यांपासून ते प्रशिक्षकांपर्यंत सर्वांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
स्निकोमीटरवर हालचाल दिसूनही ‘OUT’ का? :
11 एप्रिल रोजी चेपॉक स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात धोनीने नवव्या क्रमांकावर फलंदाजीला येत 4 चेंडूत 1 धाव केली. पण 16 व्या षटकात सुनील नारायणच्या चेंडूवर त्याच्याविरुद्ध एलबीडब्ल्यू अपील करण्यात आलं आणि पंचांनी त्याला बाद ठरवलं. त्यानंतर धोनीने लगेच डीआरएस घेतला आणि याच निर्णयावरून मोठा गोंधळ उडाला.
Stephen Fleming & Ambati Rayudu now after DOT BALL & CAPTAIN MS Dhoni’s wicket — Excited or Sad?
The Chepauk silence says it all…#CSKvsKKR #Thala #IPL2025 #KKRvCSK #Rayudu pic.twitter.com/UOWReTB51O pic.twitter.com/0VllKiJWKO— Veeresh Kumar (@VeereshKum9526) April 11, 2025
थर्ड अंपायरने स्निकोमीटर वापरून निर्णय घेतला. जेव्हा चेंडू धोनीच्या बॅटजवळ आला, तेव्हा स्निकोमीटरवर स्पष्ट हालचाल दिसून आली. त्यामुळे बॉल बॅटला लागला असल्याचा संशय उपस्थित झाला. मात्र, थर्ड अंपायरने तो बॅटला लागला नसल्याचा निष्कर्ष देत बॉल ट्रॅकिंगच्या आधारे ‘OUT’ निर्णय कायम ठेवला.
MS Dhoni Out or Not l स्टीफन फ्लेमिंग अंपायरवर भडकले :
या निर्णयामुळे सीएसकेचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग थेट मैदानात उतरले आणि फील्ड अंपायर क्रिस गॅफनी यांच्याशी चर्चा करताना दिसले. त्यांना आश्चर्य वाटलं की जर बॅटला चेंडू लागलेला नव्हता, तर स्निकोमीटरवर स्पष्ट हालचाल कशी दिसली? यावर थर्ड अंपायरने कोणतंही स्पष्ट स्पष्टीकरण दिलं नाही, यामुळे वाद अधिक गहिरे झाले आहेत.
धोनीने निर्णयाचा मान राखत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही, मात्र सोशल मीडियावर चाहत्यांनी ‘NOT OUT’ असल्याचा दावा करत अंपायरच्या निर्णयावर टीका केली आहे.






