Motorola | मोटोरोलाने आपल्या इलेक्ट्रॉनिक्स पोर्टफोलिओचा विस्तार करत टॅबलेट आणि लॅपटॉप सेगमेंटमध्ये प्रवेश करण्याची तयारी केली आहे. येत्या 15 एप्रिलला कंपनी ‘मोटो पॅड 60 प्रो’ आणि ‘मोटो बुक 60’ ही दोन प्रीमियम डिव्हाइसेस भारतात लाँच करणार आहे. याआधीच यांची झलक आणि काही खास वैशिष्ट्ये समोर आली आहेत. (Motorola)
मोटो पॅड 60 प्रो: स्टायलस सपोर्ट-प्रीमियम टॅबलेट
मोटोरोलाचा नवा टॅबलेट – मोटो पॅड 60 प्रो – हिरव्या रंगात सादर केला जाणार असून, त्यात स्टायलस पेन सपोर्ट देखील देण्यात आला आहे. यामध्ये मोठा स्क्रीन असून चारही कोपऱ्यांवर ब्लॅक बेजल्स पाहायला मिळतात. टॅब्लेटच्या उजव्या काठावर व्हॉल्यूम रॉकर आणि वरच्या भागात पॉवर बटण, स्पीकर व्हेंट्स आणि सिम ट्रे स्लॉट आहे. टॅबच्या खालच्या भागात USB टाइप-सी पोर्ट व स्पीकर्स देण्यात आले आहेत.
टॅब्लेटच्या मागील बाजूस डाव्या वरच्या कोपऱ्यात स्क्वेअर कॅमेरा मॉड्यूल आहे, ज्यामध्ये 13MP कॅमेरा व LED फ्लॅश आहे. त्याच खाली टेक्सचर्ड डिझाइन दिलं असून, यामुळे टॅब्लेटला ड्युअल टोन लूक प्राप्त झाला आहे. रेंडर इमेजनुसार टॅबमध्ये मोटो ब्रँडिंग, एक स्टायलस पेन आणि एक खास बटण देखील दिसते. हा टॅब लेनोवो आयडिया टॅब प्रोचा रिब्रँड असल्याचं मानलं जात असून, याची किंमत सुमारे ₹27,999 असू शकते.
मोटो बुक 60: मोटोरोलाचा पहिला लॅपटॉप
मोटोरोलाचा पहिला लॅपटॉप – मोटो बुक 60 – हिरव्या आणि निळ्या रंगात उपलब्ध होणार आहे. या लॅपटॉपवर ‘मोटो डिंपल’ वरच्या झाकणावर दिलं गेलं असून, यामुळे त्याला खास ओळख मिळते. लॅपटॉपचा समोरचा भाग पूर्णपणे डिस्प्ले असलेला असून त्यावर अतिशय पातळ बेझल्स आहेत.
लॅपटॉपच्या डाव्या बाजूस एक 3.5 मिमी ऑडिओ जॅक आणि अनेक टाइप-सी पोर्ट आहेत. दोन्ही बाजूंना स्पीकर व्हेंट्स असून कीबोर्डवर ‘Dolby Atmos’ ब्रँडिंग असलेली एक विशेष रचना आहे. लॅपटॉप आणि टॅबलेट दोन्ही Pantone क्युरेटेड रंगसंगतीत सादर केले जातील, आणि यांच्यासोबत मोटोरोला एज 60 स्टायलस सुद्धा 15 एप्रिलला लाँच केला जाणार आहे. (Motorola)
या नव्या डिव्हाइसेसची किंमत आणि संपूर्ण वैशिष्ट्ये अधिकृत लाँच इव्हेंटमध्ये समोर येतील, मात्र लाँचपूर्वीच यांना टेक विश्वातून मोठा प्रतिसाद मिळताना दिसतो आहे.
English Title: Motorola to Launch Tab, Laptop on April 15








