कोथरूडमधील राड्यानंतर गजा मारणे टोळीवर मोठी कारवाई!

On: February 24, 2025 1:48 PM
Mokka on Gaja Marne Gang in Pune 
---Advertisement---

Gaja Marne Gang | काही दिवसांपूर्वी पुण्यात (Pune) पुन्हा एकदा गजा मारणे (Gaja Marne Gang) टोळीचा उन्माद दिसून आला होता. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या एका व्यक्तीला गजा मारणे टोळीकडून बेदम मारहाण झाल्याची माहिती समोर आली होती. अशातच आता पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे याच्यावर पोलिसांनी मोक्का (Mokka) लावला आहे.

‘या’ प्रकरणात कारवाई

देवेंद्र जोग (Devendra Jog) मारहाण प्रकरणात गजा मारणे आरोपी आहे. त्यामुळे पुणे पोलिसांनी (Pune Police) मोठी कारवाई केली. कोथरूड (Kothrud) भागात गाडीचा धक्का लागल्याने वाद झाला आणि त्यातून आयटी इंजिनियर (IT Engineer) असलेल्या देवेंद्र जोग यांना मारहाण करण्यात आली होती.

देवेंद्र जोग शिवजयंतीच्या दिवशी (Shiv Jayanti), म्हणजेच १९ फेब्रुवारीला बुधवारी दुपारी कोथरूड भागातील भेलकेनगर परिसरातून दुचाकीवरून निघाले होते. त्यावेळी गजानन मारणे टोळीतील बाबू पवार (Babu Pawar), किरण पडवळ (Kiran Padwal), ओम तीर्थराम (Om Tirthram) आणि अमोल तापकीर (Amol Tapkir) या चौघांनी गाडीचा धक्का लागला, असं म्हणत जोग यांना मारहाण केली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं.

मुरलीधर मोहोळ यांनी घेतली दखल 

मुरलीधर मोहोळ यांनी स्वत: जोग यांची भेट घेतली आणि विचारपूस केली होती. या प्रकरणात पोलिसांनी चारपैकी तीन आरोपींना अटक केली असून चौथा आरोपी बाबू पवार हा फरार झाला आहे. बाबू पवार हा गजा मारणे याचा भाचा आहे. त्यामुळे आता मामा-भाचे अडचणीत सापडल्याचं चित्र पहायला मिळतंय. (Gaja Marne Gang)

मोहोळ यांनी आपल्या सोशल मीडियावर या भेटीचे फोटो शेअर करत घटनेबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, “गुजरात आणि दिल्ली दौऱ्यावर असल्याने मी पुण्यात पोहोचल्यानंतर थेट देवेंद्रच्या घरी गेलो. संपूर्ण घटना समजून घेतली आणि त्याच्या कुटुंबाला धीर दिला.

देवेंद्र हा एक गुणी संगणक अभियंता आहे आणि शांत स्वभावाचा तरुण आहे. कोणाच्याही वाट्याला न जाणाऱ्या अशा तरुणाला मारहाण होणे दुर्दैवी आहे. यापुढे अशा घटना घडू नयेत यासाठी कठोर कारवाई करण्याच्या सूचना पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना दिल्या आहेत.”

Title : Mokka on Gaja Marne Gang in Pune 

 

Join WhatsApp Group

Join Now