मोदींच्या काळात मोबाईल रिचार्ज ९४ टक्क्यांनी स्वस्त झाले, सरकारने दिली आकडेवारी

On: February 7, 2025 9:27 AM
Mobile Recharge
---Advertisement---

Mobile Recharge | मोबाईल फोनच्या (Mobile Phone) रिचार्जसाठी (Recharge) अधिक शुल्क आकारले जात असल्याची टीका विरोधक आणि सोशल मीडियावर (Social Media) होत आहे. मात्र, ही टीका केंद्रीय दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया (Jyotiraditya Scindia) यांनी फेटाळून लावली आहे. 2014 पासून मोबाईल फोनचे दर 94 टक्क्यांनी कमी झाले असल्याचे त्यांनी संसदेत (Parliament) एका पुरवणी प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

सिंधिया यांचा दावा :

-देशात 2014 मध्ये 90 कोटी मोबाइल ग्राहक होते, आता त्यांची संख्या 116 कोटी आहे.
– 2014 मध्ये 25 कोटी इंटरनेट ग्राहक (Internet users) होते, आज ही संख्या 97.44 कोटी आहे.
– ग्राहकांची संख्या वाढते तेव्हा दरांवर देखरेख ठेवणे आवश्यक आहे.
– भारतात जगभरात सर्वात स्वस्त व्हॉइस (Voice) आणि डेटा शुल्क (Data Charges) आहे.

Mobile Recharge l मोबाइल रिचार्ज कसा स्वस्त झाला?

वर्ष          मोबाइल ग्राहक   इंटरनेट ग्राहक        1 मिनिट कॉल दर    1 जीबी डेटा
2014    20 कोटी               25 कोटी               0.50 (50 पैसे)        270 रुपये
2024    116 कोटी             97.44 कोटी             0.03 (3 पैसे)       9.70 रुपये
फरक    26 कोटी वाढले      72.44 कोटी वाढले     94% घट           93% घट

रिचार्ज का महागला?

5G सेवेमुळे (5G Service) शुल्कात 10 टक्के वाढ झाली. 22 महिन्यांत 28 टक्के जिल्हे आणि 82 टक्के लोकसंख्येला 5G सेवा मिळण्यास सुरुवात झाली. यासाठी कंपन्यांनी 4.5 लाख कोटी रुपये गुंतवलेत. त्यामुळे यातून परतावा मिळायला हवा, त्यामुळे दरवाढ (Price Hike) योग्य असल्याचे त्यांनी म्हटले.

काँग्रेसचा सवाल :

शुल्कवाढीमुळे 119 कोटी मोबाइलधारकांवर 35 कोटींचा अतिरिक्त बोजा बसला आहे. सरकारने या दरवाढीची दखल घेतली आहे का, असा प्रश्न काँग्रेसच्या (Congress) सुरजेवाला (Surjewala) यांनी विचारला.

News Title : Mobile Recharge Cheaper by 94%? Government’s Claim; Price Hike Justified for Company Returns!

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now