वाल्मिक कराडवर मोक्का लागताच सुरेश धसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

On: January 14, 2025 5:56 PM
Suresh Dhas
---Advertisement---

Suresh Dhas l बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबरला हत्या करण्यात आली. या घटनेला एक महिना उलटला आहे तरी देखील हे हत्याप्रकरण प्रचंड चर्चेत आहे. अशातच आज या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी आणि खंडणी प्रकरणात कोठडीत असलेला आरोपी वाल्मिक कराडवर मोक्का लावण्यात आला आहे. मात्र हा घटनेप्रकरणी भाजप आमदार सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सुरेश धस काय म्हणाले? :

यासंदर्भात आमदार सुरेश धस म्हणाले की, “एसआयटीने आज जे काही काम केलं आहे, ते फर्दर डेव्हल्पमेंट नुसार कोर्ट ऑर्डर देत आहे. त्यामुळे याविषयी कोणी मागणी केली याचा काहीही विषय नाही. तसेच राज्य सरकारने नेमलेल्या एसआयटीने हे महत्वाचं काम केलं आहे, त्यामुळे आता कोणत्या गुन्ह्यात मोक्का लावला काही माहीत नाही. परंतु, कायद्याच्या कचाट्यात जो कोणी सापडेल त्याला नक्की शिक्षा होईल”, असं सुरेश धस म्हणाले आहेत.

दरम्यान, “या प्रकरणाचा तपास करायला पोलीस यंत्रणा आहे, त्यामुळे आम्ही बोलून काही होत नाही. तसेच या प्रकरणी एसआयटी प्रभावीपणे काम करत आहे. त्यामुळे त्यांनी नियमाप्रमाणे जी कडी जोडली असेल त्यात जे सापडतील त्यांना नक्की शिक्षा होईल. याशिवाय तिथे काय घडलं आहे हे मला माहीत नाही. मात्र एसआयटीने कोर्टासमोर अर्ज केला आहे एवढंच मला माहीत आहे. परंतु, कायद्यापेक्षा कोणी मोठा नसतो हे मात्र निश्चित आहे. दरम्यान आता SIT ने कारवाई केली आहे. परत परत त्यावर बोलण्याची आता गरज नाही”, असं आमदार सुरेश धस यांनी म्हटलं आहे.

Suresh Dhas l मोक्का लागल्यामुळे काय होणार? :

आज वाल्मिक कराडवर मोक्का लागला आहे. त्यामुळे आता पोलिसांना तपासासाठी तब्बल 180 दिवस मिळाले आहेत. तसेच याप्रकरणी पोलीस 180 दिवसांमध्ये आरोपपत्र दाखल करू शकतात. याशिवाय मोक्का लावल्यामुळे आरोपीला लवकर जामीन देखील मिळत नाही. मोक्का लागल्यास आरोपीचा कबुली जबाब हा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येत असतो.

दरम्यान, वाल्मिक कराडची केज न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अशातच आता वाल्मिक कराडचा तपास आता एसआयटीकडे देण्यात आला आहे. त्यामुळे आता वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ होणार असल्याचं दिसून येत आहे.

News Title : MLA Suresh Dhas first reaction on  walmik karad macoca

महत्वाच्या बातम्या-

वाल्मिक कराडला लागोपाठ दुसरा मोठा धक्का, कोर्टाने घेतला मोठा निर्णय

“हो, पुरुषांचा प्रायव्हेट पार्ट माझ्यासाठी…”, करीना कपूरच्या ‘त्या’ वक्तव्याने हादरलं होतं बॉलिवूड

वाल्मिक कराडच्या आईची तब्येत खालावली; अन्न-पाणीही सोडलं!

“निव्वळ जातीयवाद”, मोक्का लागताच कराडच्या बायकोने केले मोठे आरोप

अन् 10 मिनिटांत परळी झाली बंद!, वाल्मिक कराड प्रकरणात सर्वात मोठी अपडेट

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now