‘राम राज्य’ आणि ९ टक्के हिंदू? मिथुन चक्रवर्तींच्या विधानामुळे राजकीय वादळ!

On: April 7, 2025 11:42 AM
Mithun Chakraborty
---Advertisement---

Mithun Chakraborty l बॉलिवूडमधून राजकारणात प्रवेश करणारे अभिनेते व भाजप नेते मिथुन चक्रवर्ती पुन्हा एकदा त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आले आहेत. “राज्यात 9 टक्के हिंदू जर आमच्यासोबत उभे राहिले, तर राम राज्य येईल”, असं विधान त्यांनी केल्यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे.

पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगणा जिल्ह्यात झालेल्या सभेत त्यांनी हे वक्तव्य केलं. याआधी देखील त्यांनी अशा स्वरूपाची वक्तव्य केली असून विरोधकांनी ती धर्माच्या आधारे मतं मागण्याचा प्रयत्न असल्याचं म्हणत निषेध नोंदवला आहे.

“9% हिंदूंनी मतदान केलं नाही, म्हणून आपण हरतो” – मिथुन दा :

सभेत बोलताना मिथुन चक्रवर्ती म्हणाले, “बंगालमध्ये अजूनही 9% हिंदू मतदान करत नाहीत. त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना बाहेर काढा. कारण आपण जिंकलो नाही, तर हिंदू बंगाली अडचणीत येतील.” यापुढे त्यांनी बांग्लादेशचं उदाहरण देत पश्चिम बंगालमध्ये भाजपचा विजय आवश्यक असल्याचं सांगितलं.

“विरोधक सत्तेत आले, तर ते भाजप समर्थक हिंदू बंगाल्यांचा नाश करतील,” असंही त्यांनी स्पष्टपणे म्हटलं. त्यामुळे या वक्तव्यामुळे सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाची मालिका सुरू झाली आहे.

Mithun Chakraborty l “उमेदवार आवडतो की नाही, ते विसरा – फक्त भाजपला मतदान करा” :

मिथुन चक्रवर्ती यांनी याआधीही अनेकदा भाजपला विजयी करण्याचं आवाहन करत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की, “मला हा उमेदवार आवडत नाही… असं बोलण्याची वेळ गेली. भाजपचाच उमेदवार निवडा. हेच तुमच्या भवितव्यासाठी महत्त्वाचं आहे.”

त्यांनी ममता बॅनर्जी सरकारवरही अप्रत्यक्षपणे निशाणा साधला, आणि भाजपचं सरकार सत्तेत आलं तरच हिंदू बंगाल्यांचं रक्षण होईल, असा पुनरुच्चार केला.

News Title: Mithun Chakraborty’s Remark on “Ram Rajya” and 9% Hindu Voters Sparks Political Row

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now