खळबळजनक खुलासा! मंत्री योगेश कदमांनी थेट गुंड निलेश घायवळच्या भावाला दिला शस्त्र परवाना

On: October 8, 2025 8:21 PM
Yogesh Kadam Controversy
---Advertisement---

Nilesh Ghaiwal News | पुण्यातील (Pune) कुख्यात गुंड निलेश घायवळचा (Nilesh Ghayawal) भाऊ सचिन घायवळला गृहराज्यमंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांनी शस्त्र परवाना दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मंत्री कदमांनी सचिन घायळवला दिला शस्त्र परवाना :

पुणे शहरात सध्या खळबळ उडवणार प्रकरण समोर आले आहे. कुख्यात गुंड निलेश घायवळचा (Nilesh Ghaiwal) भाऊ सचिन घायवळ याला राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी शस्त्र परवाना दिल्याचे धक्कादायक सत्य उघडकीस आले आहे. पुणे पोलिसांनी सचिन घायवळला (Sachin Ghaiwal) आधीच शस्त्र परवाना देण्यास नकार दिला होता. कारण त्याच्यावर खुनाचा प्रयत्न आणि आर्म्स ॲक्टसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. मात्र, गृहखात्याकडे अपील केल्यानंतर पोलिसांचा विरोध फेटाळून या परवान्यास मंजुरी मिळाली आहे.

गृहराज्यमंत्र्यांचे आदेशात नेमकं काय म्हटलंय? :

1) अपिलार्थीचा अपील अर्ज मंजूर करण्यात येत आहे.
2 पोलीस आयुक्त, पुणे शहर दि.20 जानेवारी 2025 चा आदेश रद्द करण्यात येत आहे.
3) पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी अपिलार्थी यांना विहीत कार्यपद्धती अवलंबून शस्त्र परवाना देण्याबाबत पुढील आवश्यक कारवाई करावी.

योगेश कदम
राज्यमंत्री (गृह)(शहरे), महाराष्ट्र राज्य

Nilesh Ghaiwal News | पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह :

हे प्रकरण सध्या राज्यभर चर्चेत असून, पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न निर्माण झाला आहे. कारण निलेश घायवळने बनावट पासपोर्ट काढून परदेशात पळ काढल्यानंतर पुणे आणि अहिल्यानगर पोलिसांचे धाबे दणाणले होते, आणि त्यांच्या कार्यपद्धतीवर मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला होता.

धक्कादायक बाब म्हणजे, गृहराज्यमंत्री यांच्या हस्तक्षेपामुळे सचिन घायवळला पोलिसांच्या विरोधाला बंधन न देता शस्त्र परवाना मिळाला. सचिन घायवळ (Sachin ghaiwal) हा निलेश घायवळ (Nilesh Ghaiwal) यांच्यानंतर टोळीचा म्होरक्या म्हणून ओळखला जातो. पोलिसांनी सुरुवातीला अर्ज फेटाळून लावला, पण नंतर गृहमंत्रालयाच्या आदेशावर तो मंजूर झाला.

राज्यातील जनतेमध्ये या निर्णयामुळे मोठा आश्चर्याचा आणि संतापाचा प्रकार उभा राहिला आहे. अनेकांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आणि राजकीय हस्तक्षेपावर सवाल उपस्थित केले आहेत. हे प्रकरण पुढील काही दिवसात अधिक मोठ्या राजकीय चर्चेत आणि तपासात येण्याची शक्यता आहे.

News Title :- Shocking News! Minister Yogesh Kadam Grants Gun License to Notorious Gangster Nilesh Ghaywal’s Brother

Join WhatsApp Group

Join Now