पुण्यात म्हाडाची 4000 घरांची मेगा लॉटरी; जाणून घ्या संपूर्ण माहिती एका क्लिकवर

On: July 6, 2026 3:04 PM
MHADA Pune Lottery
---Advertisement---

MHADA Lottery | पुण्यात स्वतःच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. म्हाडा (MHADA) पुणे मंडळ लवकरच 4 हजार परवडणाऱ्या घरांसाठी मेगा लॉटरी जाहीर करण्याच्या तयारीत आहे. या घरांच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्यात असतील आणि अर्ज प्रक्रियाही लवकरच सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पुणे, पिंपरी-चिंचवडसह ग्रामीण भागात उपलब्ध होणार घरे :

महानगरांमध्ये घरांच्या वाढत्या किमतीमुळे स्वतःचे घर घेणे अनेकांसाठी कठीण झाले आहे. हीच गरज लक्षात घेऊन म्हाडा (MHADA) कमी किमतीत घरे उपलब्ध करून देत असते. म्हाडा पुणे मंडळ (MHADA Pune Board) आता तब्बल 4 हजार घरांच्या विक्रीसाठी लॉटरी काढण्याच्या अंतिम टप्प्यात असून त्यासाठीची तयारी जवळपास पूर्ण झाल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी पुणे मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांनी नजीकच्या काळात सुमारे 10 हजार नवीन घरे उभारण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले होते.

या मेगा गृहनिर्माण योजनेअंतर्गत उपलब्ध होणारी घरे पुणे (Pune) शहर, पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) तसेच पुणे ग्रामीण भागातील विविध गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये असतील. म्हाडाने आखलेल्या 10 हजार घरांच्या नियोजनातील पहिल्या टप्प्यात 4 हजार घरे विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे परवडणाऱ्या दरात घर खरेदी करू इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी ही मोठी संधी ठरणार आहे.

MHADA Lottery | 20 ते 30 लाखांत घरे; जुलै अखेरीस जाहिरातीची शक्यता :

या लॉटरीमध्ये समाविष्ट असलेल्या 4 हजार घरांपैकी सुमारे 3 हजार घरे 20 टक्के योजनेतून उपलब्ध झाली आहेत. त्याशिवाय यापूर्वी रिक्त राहिलेली सुमारे 1 हजार घरेही या सोडतीत समाविष्ट करण्यात येणार आहेत. अशा प्रकारे एकूण 4 हजार घरांसाठी लॉटरी काढली जाणार असून ही घरे प्रामुख्याने अत्यल्प उत्पन्न गट आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी राखीव असतील.

प्राथमिक माहितीनुसार, या घरांची संभाव्य किंमत 20 लाख ते 30 लाख रुपयांच्या दरम्यान असू शकते. प्रत्येक घराचे क्षेत्रफळ सुमारे 30 ते 50 चौरस मीटर इतके असण्याची शक्यता आहे. म्हाडाने लॉटरीसाठी आवश्यक तयारी पूर्ण केली असून जुलै महिन्याच्या अखेरीस अधिकृत जाहिरात प्रसिद्ध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर ऑनलाइन नोंदणी आणि अर्ज प्रक्रिया सुरू होईल. मात्र, अर्जाची अंतिम तारीख आणि सोडतीची अधिकृत तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

News Title: MHADA Pune 4000 Homes Lottery

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now