आनंदाची बातमी! म्हाडाच्या घरांच्या किंमती कमी होणार?

On: May 25, 2026 5:25 PM
MHADA Pune Lottery
---Advertisement---

MHADA Lottery | मुंबई (Mumbai) आणि ठाणे (Thane) परिसरात स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न अनेक सर्वसामान्य नागरिक पाहतात. मात्र वाढत्या घरांच्या किंमतींमुळे हे स्वप्न पूर्ण करणे कठीण बनले आहे. अशातच म्हाडा (MHADA) प्रशासनाने घरांच्या किंमती कमी करण्याच्या दिशेने हालचाली सुरू केल्याची माहिती समोर आली असून त्यामुळे हजारो घरं सर्वसामान्यांच्या आवाक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

घरांच्या किंमती कमी करण्यासाठी हालचाली :

गेल्या काही वर्षांत म्हाडाच्या (MHADA) मुंबई आणि कोकण मंडळाच्या लॉटरीमधील घरांच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झाली होती. त्यामुळे अनेक नागरिकांनी लॉटरीकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले. काही प्रकल्पांमध्ये पायाभूत सुविधांचा अभाव असल्याच्या तक्रारीदेखील करण्यात आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर घरांच्या किंमती कमी करण्यासाठी म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल (Sanjeev Jaiswal) यांनी पुढाकार घेतला आहे.

संजीव जयस्वाल (Sanjeev Jaiswal) यांनी अलीकडेच कोकण मंडळातील विविध गृहनिर्माण प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी केली. यानंतर भविष्यातील लॉटरीतील घरांच्या किंमती कमी करण्याबाबत चर्चा करण्यासाठी विशेष बैठकीचे आयोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे आगामी काळात लॉटरीतील घरं अधिक परवडणाऱ्या दरात उपलब्ध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

MHADA Lottery | ठाण्यात 25 हजारांहून अधिक घरे

म्हाडाच्या (MHADA) कोकण मंडळाकडून याआधी 2018 मध्ये 2032 घरांसाठी, 2021 मध्ये 2016 घरांसाठी आणि 2025 मध्ये 1012 घरांसाठी लॉटरी काढण्यात आली होती. या घरांपैकी सुमारे 70 टक्के लाभार्थींना घरांचा ताबा देण्यात आला असून उर्वरित प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.

ठाणे (Thane) जिल्ह्यातील शिरढोण, खोणी, गोठेघर आणि भंडार्ली परिसरात मोठ्या प्रमाणात गृहनिर्माण प्रकल्प उभारले जात आहेत. खोणी येथे अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटासाठी 7174 घरे आणि 152 दुकाने उभारण्यात येत आहेत. तर शिरढोण प्रकल्पात 18 हजार 692 घरे आणि 342 दुकाने बांधली जात आहेत. आगामी बैठकीत घरांच्या किंमती कमी करण्याचा निर्णय झाल्यास ठाणे परिसरात 25 हजारांपेक्षा अधिक घरे कमी दरात उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.

News title : MHADA Lottery 2026 Update

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now