‘ही’ इलेक्ट्रिक कार ठरली ग्राहकांची पहिली पसंती, विक्रीमध्ये टाटाच्या ‘या’ गाड्यांनाही टाकलं मागे!

On: February 12, 2025 1:50 PM
MG Windsor EV Becomes Customers' Top Choice, Beats Tata's Cars in Sales!
---Advertisement---

MG Windsor EV | भारतात आता इलेक्ट्रिक कारची (Electric car) विक्री वेगाने वाढत आहे. बाजारात नवीन आणि परवडणारी मॉडेल्स (Models) येत असल्यामुळे हा विभाग आता खूप मोठा झाला आहे. काही काळापूर्वी टाटा नेक्सॉन ईव्ही (Tata Nexon EV) आणि पंच ईव्ही (Punch EV) सारख्या कार ग्राहकांची पहिली पसंती होत्या, पण आता एमजी विंडसर ईव्हीने (MG Windsor EV) विक्रीच्या बाबतीत सर्वांना मागे टाकले आहे.

एमजी विंडसर ईव्ही ठरली नंबर वन

काही काळापूर्वी भारतात टाटाच्या (Tata) इलेक्ट्रिक कारची खूप मागणी होती, परंतु एमजी विंडसर ईव्ही आल्याने ग्राहकांना एक चांगला पर्याय मिळाला, तसेच या गाडीच्या विक्रीतही प्रचंड वाढ झाली. गेल्या महिन्यात विंडसर ईव्हीच्या 3,450 युनिट्सची विक्री झाली. विक्रीच्या बाबतीत या गाडीने टाटा पंच ईव्ही, नेक्सॉन ईव्ही, टियागो ईव्ही (Tiago EV), टिगोर ईव्ही (Tigor EV) आणि कर्व्ह ईव्ही (Curvv EV) यांनाही मागे टाकले.

5 महिन्यांपासून नंबर 1 वर

गेल्या 5 महिन्यांत एमजी विंडसर ईव्हीच्या 13,997 युनिट्सची विक्री झाली. तर याच काळात टाटा नेक्सॉन ईव्हीच्या 7,047 युनिट्स आणि टाटा पंच ईव्हीच्या 5,708 युनिट्सची विक्री झाली. विंडसर ईव्हीमध्ये काही खास वैशिष्ट्ये आहेत जी तुम्हाला इतर कोणत्याही कारमध्ये  दिसणार नाहीत.

Capture

किंमत आणि वैशिष्ट्ये

एमजी विंडसर ईव्हीची एक्स-शोरूम (Ex-showroom) किंमत 9.99 लाख रुपयांपासून सुरू होते. परंतु, या किमतीत बॅटरीचा खर्च समाविष्ट नाही. एमजी आपल्या ईव्ही (EV) रेंजसाठी बास (BaaS) प्रोग्राम घेऊन आली आहे. याद्वारे ग्राहक बॅटरी स्वतंत्रपणे भाड्याने घेऊ शकतात, ज्यासाठी 3.50 रुपये प्रति किलोमीटर दराने पैसे द्यावे लागतील.

विंडसर ईव्हीच्या सीट्स (Seats) आणि स्पेस (Space) जमेची बाजू आहे. या कारमध्ये 15.6 इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम (Touchscreen infotainment system) मिळते, यासोबतच फुल-डिजिटल इंस्ट्रुमेंट क्लस्टर, कीलेस एन्ट्री, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आणि वायरलेस फोन चार्जिंग पोर्ट (Wireless phone charging port) यांसारखी वैशिष्ट्येही देण्यात आली आहेत. सुरक्षिततेसाठी, यात एअरबॅग्ज (Airbags), अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टमसह (Anti-lock braking system) ईबीडीची (EBD) सुविधा मिळते.

332 किलोमीटरची रेंज

बॅटरी आणि रेंज बद्दल बोलायचं झाल्यास, एमजी विंडसर ईव्हीमध्ये 38kWh चा बॅटरी पॅक मिळतो, जो 45kW डीसी चार्जर (DC charger) आणि फास्ट चार्जिंगने (Fast charging) सुसज्ज आहे. एका चार्जमध्ये ही कार 332 किलोमीटरची रेंज देते. फास्ट चार्जिंग सिस्टमच्या मदतीने, बॅटरी फक्त 55 मिनिटांत 10% ते 80% पर्यंत चार्ज होते.

Title : MG Windsor EV Becomes Customers’ Top Choice, Beats Tata’s Cars in Sales!

 

Join WhatsApp Group

Join Now