बुधाच्या कृपेने ‘या’ राशींची सर्व संकटे दूर होणार; २१ मार्चपासून मिळणार मोठी आनंदाची बातमी

On: March 20, 2026 1:32 PM
Astrology
---Advertisement---

Budh Margi 2026 | वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या हालचालींचा मानवी जीवनावर मोठा प्रभाव पडतो. विशेषतः बुध ग्रहाला बुद्धिमत्ता, संवाद, व्यापार आणि निर्णयक्षमता यांचा कारक मानलं जातं. त्यामुळे बुध ग्रहाच्या स्थितीत होणारा बदल अनेक राशींसाठी महत्त्वाचा ठरतो. आता अवघ्या 24 तासांत बुध ग्रहाची चाल बदलणार असल्याने काही राशींसाठी अत्यंत शुभ काळ सुरू होणार आहे.

पंचांगानुसार 21 मार्च 2026 रोजी दुपारी 1 वाजून 2 मिनिटांनी बुध ग्रह कुंभ राशीत मार्गी होणार आहे. सध्या बुध ग्रह वक्री अवस्थेत असून त्याच्या मार्गी होण्यामुळे अनेक राशींना सकारात्मक परिणाम अनुभवायला मिळतील. विशेष म्हणजे कुंभ राशीत आधीच मंगळ आणि राहू ग्रह उपस्थित असल्याने या योगाचा प्रभाव अधिक जाणवण्याची शक्यता आहे.

‘या’ राशींना मिळणार मोठा फायदा :

मेष :

मेष राशीच्या अकराव्या भावात बुध ग्रह मार्गी होणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांसाठी प्रगतीचे अनेक मार्ग खुलणार आहेत. कामाच्या ठिकाणी तुमची मेहनत आणि धावपळ वाढेल, पण त्याचे सकारात्मक परिणामही दिसतील. भविष्यासंबंधी महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी हा काळ अनुकूल ठरेल. तसेच गुंतवणुकीसाठीही हा काळ फायदेशीर ठरू शकतो.

वृषभ :

वृषभ राशीच्या दहाव्या भावात बुध ग्रह मार्गी होणार आहे. त्यामुळे करिअरमध्ये प्रगतीची शक्यता निर्माण होईल. नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. आर्थिक स्थितीही सुधारेल. या काळात केलेली गुंतवणूक भविष्यात फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे.

मिथुन :

मिथुन राशीच्या नवव्या भावात बुध ग्रह मार्गी होणार आहे. त्यामुळे नशिबाची चांगली साथ मिळेल. करिअर आणि व्यवसायात नवीन संधी निर्माण होतील. तुम्ही आखलेल्या योजना यशस्वी होण्याची शक्यता आहे. तसेच धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्यात तुमचं मन रमेल.

Budh Margi 2026 | कुंभ आणि मीन राशींनाही मिळणार सकारात्मक परिणाम :

कुंभ :

कुंभ राशीच्या लग्न भावात बुध ग्रह मार्गी होणार आहे. त्यामुळे निर्णय घेण्याची क्षमता वाढेल. कुटुंबातील सदस्यांचा पाठिंबा मिळेल आणि घरातील वातावरण आनंदी राहील. तसेच कामाच्या ठिकाणीही तुमची प्रतिमा मजबूत होण्याची शक्यता आहे.

मीन :

मीन राशीच्या बाराव्या भावात बुध ग्रह मार्गी होणार आहे. या काळात काही अडचणी कमी होताना दिसतील. तुमच्या मेहनतीला योग्य फळ मिळण्याची शक्यता आहे. प्रगतीचे मार्ग मोकळे होतील आणि नशिबाची साथही मिळू शकते.

News Title: Mercury Turns Direct on March 21: These 5 Zodiac Signs Will See Positive Changes and Good Fortune

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now