रुग्णांच्या खिशाला झळ, 1 एप्रिलपासून ‘या’ आजारांवरील औषधे महागणार!

On: March 28, 2025 12:31 PM
Medicine Price Hike
---Advertisement---

Medicine Price Hike | 1 एप्रिलपासून देशभरातील कोट्यवधी रुग्णांना औषधांच्या वाढलेल्या किमतींचा फटका बसणार आहे. अत्यावश्यक औषधांच्या दरात वाढ होणार असून, याचा थेट परिणाम सामान्यांच्या खिशावर होणार आहे. कॅन्सर, मधुमेह, हृदयरोगांसाठी लागणाऱ्या गोळ्या आता महाग होणार आहेत. (Medicine Price Hike)

NPPA चा निर्णय, औषधांचाही दरवाढीचा फटका

राष्ट्रीय औषधी मूल्य निर्धारण प्राधिकरण (NPPA) या केंद्रीय संस्थेने औषध कंपन्यांना दरवाढीसाठी हिरवा कंदील दिला आहे. यामध्ये राष्ट्रीय आवश्यक औषध यादी (NLEM) अंतर्गत येणाऱ्या अत्यावश्यक औषधांचाही समावेश आहे. केंद्र सरकारने याआधी अनेक औषधांना किंमत नियंत्रण यादीत समाविष्ट करून दरवर्षी सुमारे 3,788 कोटी रुपयांची बचत सामान्य रुग्णांना करून दिली होती. मात्र आता याच औषधांमध्ये किंमत वाढ होणार असल्याने रुग्णांच्या खिशाला झळ बसणार आहे.

विशेषतः कर्करोग, मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार आणि अँटिबायोटिक्ससारख्या जीवनावश्यक औषधांच्या किमतीत 1.7 टक्क्यांपर्यंत वाढ होणार आहे. ही दरवाढ लवकरच लागू होणार असून, रुग्णांना पुढील आदेश येईपर्यंत ही वाढीव किंमतच मोजावी लागणार आहे. औषध कंपन्यांसाठी ही दिलासा देणारी बाब असली, तरी सामान्य नागरिकांसाठी हा आर्थिक ताण वाढवणारा निर्णय ठरतोय.

महागाईमुळे रुग्णांवर आर्थिक भार

NPPA च्या माहितीनुसार, या दरवाढीमागे ‘महागाई आधारित किंमत पुनरावलोकन’ (Inflation-based Price Revision) ही प्रमुख कारण आहे. दरवर्षी औषधांच्या घाऊक दरात महागाईनुसार बदल होत असल्याने, कंपन्यांना किमती वाढवण्याची परवानगी दिली जाते. यंदा वायपीआय (WPI – Wholesale Price Index) मध्ये झालेल्या वाढीमुळे ही किंमतवाढ अपरिहार्य ठरली आहे.

ही दरवाढ अँटिबायोटिक्स, पेनकिलर्स, हायपरटेन्शन, डायबेटीस आणि कॅन्सरवरील औषधांमध्ये लागू होणार आहे. परिणामी, या औषधांवर अवलंबून असलेल्या लाखो रुग्णांना या वाढीचा थेट फटका बसणार आहे. जे रुग्ण नियमितपणे औषध घेतात, त्यांच्यासाठी दर महिन्याचा औषध खर्च आता अधिक होणार आहे.

 Title : Medicine Price Hike from April 1

 

Join WhatsApp Group

Join Now