Mawra Hocane l ‘सनम तेरी कसम’ या चित्रपटातून प्रसिद्धीझोतात आलेली पाकिस्तानी अभिनेत्री मावरा होकेन (Mawra Hocane) विवाहबंधनात अडकली आहे. मागील अनेक दिवसांपासून मावराच्या अफेअर आणि लग्नाच्या चर्चा रंगल्या होत्या. अखेर तिने पाकिस्तानी अभिनेता अमीर गिलानीसोबत (Ameer Gilani) लग्नगाठ बांधली आहे. त्यांच्या शाही लग्नसोहळ्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.
लग्नसोहळ्याचे फोटो व्हायरल:
या जोडप्याने ५ फेब्रुवारी २०२५ रोजी एका शानदार सोहळ्यात लग्न केले. मावरा आणि अमीर यांनी रोमँटिक पोज देत काढलेले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. “आयुष्याच्या या धावपळीत, अखेर मी तुला शोधले आहे,” असे कॅप्शन देत मावराने हे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
Mawra Hocane l मावराचा लेहेंगा आणि अमीरचा पेहराव:
मावराने या खास दिवसासाठी पेस्टल मिंट ब्लू रंगाचा लेहेंगा परिधान केला होता, ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत होती. तिच्या लेहेंग्यावर लाल आणि जांभळ्या रंगाची बॉर्डर डिझाइन होती. तिने मॅचिंग ब्लाउज घातला होता आणि डोक्यावर ओढणी घेतली होती. हिरव्या रंगाचे नाजूक दागिने घालून तिने आपला लूक पूर्ण केला होता. तर, मावराचा पती अमीरने ऑलिव्ह हिरव्या रंगाचा पठाणी कुर्ता परिधान केला होता.
मावरा आणि अमीरची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री:
मावरा आणि अमीर यांनी यापूर्वी एकत्र काम केले आहे. ‘सबात’ (Sabaat) आणि ‘नीम’ (Neem) सारख्या लोकप्रिय टेलिव्हिजन ड्रामामध्ये (Television Drama) ते एकत्र झळकले होते. त्यांनी कधीच त्यांच्या नात्याची कबुली दिली नव्हती, मात्र ते रिलेशनशिपमध्ये (Relationship) असल्याच्या चर्चा होत्या. अखेर दोघांनीही लग्न करून या नात्यावर शिक्कामोर्तब केले आहे.
मावराचा बॉलीवूड प्रवास:
मावरा ही पाकिस्तानमधील आघाडीची अभिनेत्री आहे. तिने हर्षवर्धन राणेसोबत (Harshvardhan Rane) २०१६ मध्ये ‘सनम तेरी कसम’ (Sanam Teri Kasam) या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तिचा हा चित्रपट चांगलाच गाजला होता. आता ‘सनम तेरी कसम’ चित्रपट व्हॅलेंटाईन वीकच्या (Valentine Week) निमित्ताने ७ फेब्रुवारीला पुन्हा प्रदर्शित केला जाणार आहे.








