Mauni Amavasya 2026 | हिंदू पंचांगानुसार प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील शेवटची तिथी म्हणजे अमावस्या. अमावस्येच्या दिवशी नकारात्मक ऊर्जा अधिक सक्रिय असल्याचे मानले जाते. त्यामुळे या दिवशी विशेष काळजी घेण्याचा सल्ला ज्योतिषशास्त्रात दिला जातो. धन, वैभव आणि सुख-समृद्धीसाठी अमावस्येच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते.
यंदा पौष अमावस्या 18 जानेवारी रोजी येत असून, या अमावस्येलाच मौनी अमावस्या असेही म्हटले जाते. मौनी अमावस्येला स्नान, दान आणि पुण्यकर्माला विशेष महत्त्व आहे. मात्र ज्योतिषीय गणनांनुसार, जानेवारी महिन्याच्या शेवटी मौनी अमावस्येचा काळ काही राशींसाठी आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे. विशेषतः चार राशींना या काळात सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
वृषभ आणि सिंह राशीसाठी आव्हानांचा काळ :
मौनी अमावस्येच्या काळात वृषभ राशीच्या व्यक्तींनी विशेष सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. या काळात मानसिक तणाव वाढण्याची शक्यता असून, आरोग्याशी संबंधित अडचणी निर्माण होऊ शकतात. नोकरदार वर्गासाठी कामाच्या ठिकाणी मतभेद उद्भवण्याची शक्यता आहे. मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांचा पाठिंबा मिळण्याचीही चिन्हे आहेत, त्यामुळे संयम राखणे महत्त्वाचे ठरेल. (Mauni Amavasya 2026)
सिंह राशीच्या लोकांसाठी मौनी अमावस्या अधिक आव्हानात्मक ठरू शकते. या काळात प्रॉपर्टी किंवा मालमत्तेशी संबंधित नुकसान होण्याची शक्यता आहे. काही लोकांकडून हक्क हिरावला जाण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी तणावपूर्ण वातावरणाचा सामना करावा लागू शकतो. तसेच कुटुंबात गैरसमज आणि मतभेद वाढण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे.
Mauni Amavasya 2026 | तूळ आणि मीन राशींसाठी सावधानतेचा इशारा :
तूळ राशीसाठी मौनी अमावस्येचा काळ सावधगिरीचा असणार आहे. यावेळी एखाद्या जुन्या चुकीचे परिणाम समोर येऊ शकतात आणि त्याची शिक्षा भोगावी लागू शकते. नोकरदार वर्गाला कठीण परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. मेहनत करूनही अपेक्षित फळ न मिळाल्याने निराशा येऊ शकते. त्यामुळे या काळात कोणतीही गोष्ट मनात धरून न ठेवता पुढील काळासाठी सकारात्मक विचार करण्याचा सल्ला देण्यात येतो. (Astrology Prediction)
मीन राशीच्या लोकांसाठीही मौनी अमावस्येचा काळ आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे. या काळात वाणीवर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नये, कारण नकळत चूक होऊ शकते. नकारात्मक विचारसरणी असलेल्या लोकांपासून दूर राहणे हितावह ठरेल. नशिबावर अवलंबून न राहता स्वतःच्या निर्णयांवर भर देण्याचा सल्ला दिला जात आहे.






