26 वर्षीय तरुणाने 15 महिलांवर केला बलात्कार, मॅट्रिमोनियल वेबसाईटवरुन…

On: February 20, 2025 2:07 PM
mumbai
---Advertisement---

Mumbai | वसई पूर्व येथील वालीव पोलिसांनी (Waliv Police) बुधवारी एका 26 वर्षीय युवकाला अटक केली आहे. गुजरातच्या अहमदाबादमधील हिमांशू योगेशभाई पंचाल (Himanshu Yogeshbhai Panchal) याने गेल्या अडीच वर्षांत मॅट्रिमोनियल वेबसाईटवरुन 15 हून अधिक महिलांची लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केली आणि त्यांच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे.

बनावट प्रोफाईलद्वारे महिलांची फसवणूक-

पोलिसांच्या माहितीनुसार, पंचाल याने मॅट्रिमोनियल (Matrimonial fraud) वेबसाईटवर बनावट प्रोफाइल तयार करून स्वतःला दिल्ली क्राईम ब्रँचच्या (Delhi Crime Branch) सायबर सुरक्षा विभागाचा अधिकारी असल्याचे दाखवले. तसेच, तो श्रीमंत घराण्यातील असून अनेक मालमत्ता त्याच्या नावावर असल्याचा बनाव केला.

तो महिलांशी संपर्क साधून त्यांच्यावर विश्वास बसवायचा आणि नंतर वसई, मुंबई आणि अहमदाबाद येथील हॉटेलमध्ये बोलवायचा. तिथे त्यांना लग्नाचे आश्वासन देत नकली हिरे जडित दागिने भेट द्यायचा आणि पहिल्याच भेटीत त्यांच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडायचा. त्यानंतर, काही ना काही कारण सांगून महिलांकडून पैसे उकळायचा आणि त्यांच्याशी संपर्क तोडायचा.

एका महिलेच्या तक्रारीनंतर आरोपी अटकेत-

पंचालच्या फसवणुकीचा (Matrimonial fraud) पर्दाफाश त्यावेळी झाला जेव्हा 6 फेब्रुवारी रोजी मीरा रोड येथील 31 वर्षीय महिलेने वालीव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या महिलेच्या मते, पंचालने मॅट्रिमोनियल साइटवर तिच्याशी संपर्क साधला आणि विश्वास संपादन करण्यासाठी तिला एक हिऱ्याचे नेकलेस भेट दिले, जो नंतर बनावट असल्याचे समजले. तिने वसई आणि अहमदाबादमधील दोन हॉटेल्सची माहिती पोलिसांना दिली, जिथे त्याने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे.

टेक्निकल तपासानंतर अहमदाबादमध्ये अटक-

वालीव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सनप (Sachin Sanap) यांनी सांगितले की, पंचाल हा अत्यंत चांगला इंग्रजी बोलणारा आणि गोड बोलून महिलांना आकर्षित करणारा गुन्हेगार आहे. “त्याच्याकडे पाच मोबाइल फोन आणि एक अ‍ॅपल लॅपटॉप होता.

तो नेहमी हॉटेलचे वायफाय आणि व्हॉट्सअ‍ॅप कॉलिंगचा वापर करत असे. तांत्रिक तपासानंतर आम्ही त्याला अहमदाबाद येथून अटक केली,” असे सनप यांनी सांगितले. पोलिस आता पंचालच्या इतर बळी पडलेल्या महिलांचा शोध घेत असून, त्याच्या विरुद्ध अधिक तपास सुरू आहे.

News Title : Matrimonial fraud Man Arrested for and Rape

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now