Pune News l चांगले स्थळ मिळाले म्हणून आई-वडिलांनी घाईघाईत मुलीचे लग्न लावून दिले. परंतु लग्नानंतर पती पत्नीला साधा स्पर्शही करत नव्हता. पत्नीने जेव्हा यामागचे सत्य शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण पती नपुंसक (Impotent) असल्याचे धक्कादायक सत्य समोर आले. यानंतर संतापलेल्या विवाहितेने पती आणि सासरच्या मंडळींविरोधात तक्रार दाखल केली असून, त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमके काय घडले? :
पुण्यातील कोथरूड (Kothrud, Pune) परिसरात राहणाऱ्या एका उच्चशिक्षित कुटुंबातील मर्चंट नेव्हीमध्ये (Merchant Navy) काम करणाऱ्या मुलाचे स्थळ एका उच्चशिक्षित डिझायनर (Designer) मुलीला आले. मुलगा मर्चंट नेव्हीत असल्यामुळे सहा महिने बोटीवर आणि सहा महिने घरी असे. साहजिकच, पती घरी आल्यावर पत्नीची त्याच्यासोबत वेळ घालवण्याची, त्याच्याकडून प्रेम मिळवण्याची इच्छा असे. परंतु, पती तिला साधा स्पर्शही करत नव्हता. सुरुवातीला काही दिवस सर्वकाही सुरळीत होईल या आशेवर या महिलेने दिवस काढले. मात्र, पतीच्या वागण्यात काहीच फरक पडला नाही. अखेर तिने पतीच्या या वागण्याची कारणे शोधण्याचा प्रयत्न केला असता, आपला पती ‘नपुंसक’ असल्याचे तिच्या लक्षात आले आणि तिला मोठा धक्काच बसला. काही काळ लोकलाजेस्तव शांत राहिलेल्या या महिलेने अखेर धीर एकवटून पती आणि त्याच्या आई-वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Pune News l कोथरूडमधील उच्चभ्रू वस्तीत घडला प्रकार:
हा सर्व प्रकार कोथरूडमधील एका आलिशान सोसायटीमध्ये 29 डिसेंबर 2015 ते 18 डिसेंबर 2019 या कालावधीत घडला. या प्रकरणी 36 वर्षीय पीडित महिलेने फिर्याद दाखल केली असून, तिचा 37 वर्षीय पती, 64 वर्षीय सासू आणि 66 वर्षीय सासरे यांच्याविरुद्ध भादंवि कलम 498 (अ), 417, 323, 504, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन्ही कुटुंबे उच्चशिक्षित आणि सधन:
कोथरूड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विवाहिता मुळशी तालुक्यातील एका गावामधील सधन शेतकरी कुटुंबातील आहे. तर, आरोपी पतीचे कुटुंबीय बाणेर (Baner) भागातील एका आलिशान सोसायटीमध्ये राहण्यास आहेत. सासू-सासरे देखील उच्चशिक्षित आणि गर्भश्रीमंत आहेत. फिर्यादीचा पती ‘मर्चंट नेव्ही’मध्ये कॅप्टन (Captain) आहे. पीडित विवाहितेचे आरोपीसोबत 29 डिसेंबर 2015 रोजी दोन्ही कुटुंबीयांच्या संमतीने लग्न झाले होते. लग्नानंतर काही दिवस असेच गेले. या काळात संबंधित महिलेला पतीच्या वागण्याविषयी फारशी शंका आली नाही, किंवा त्याचे विचित्र वागणेही तिच्या लक्षात आले नाही.
News Title : Married Woman Files Complaint Against Impotent Husband and In-Laws






