“महाराजांच्या भूमिकेसाठी मराठी अभिनेता असता तर…”; ‘छावा’च्या ट्रेलरवर अजिंक्य राऊतचं मोठं वक्तव्य

On: January 27, 2025 10:47 AM
Chhava
---Advertisement---

Chhava l अभिनेता विकी कौशलची (Vicky Kaushal) प्रमुख भूमिका असलेल्या ‘छावा’ (Chhava) या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटात विकीने छत्रपती संभाजी महाराजांची (Chhatrapati Sambhaji Maharaj) भूमिका साकारली आहे. ट्रेलरमधील त्याच्या अभिनयाचे जोरदार कौतुक होत आहे. मात्र महाराजांच्या भूमिकेसाठी मराठी कलाकाराची (Marathi Actor) निवड झाली असती, तर चांगलं वाटलं असतं, अशी प्रतिक्रिया एका मराठी अभिनेत्याने दिली आहे. ‘मन उडु उडु झालं’ (Man Udu Udu Jhala) या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता अजिंक्य राऊतने (Ajinkya Raut) हे मत मांडले आहे.

‘मन उडु उडु झालं’ या मालिकेतील इंद्राच्या भूमिकेमुळे लोकप्रिय झालेला अभिनेता अजिंक्य राऊत याने ‘छावा’ चित्रपटाच्या ट्रेलरवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तो म्हणतो की विकी कौशल प्रतिभावान असला तरी, महाराजांच्या भूमिकेसाठी मराठी कलाकार हवा होता.

विकीच्या अभिनयाचे कौतुक, पण… :

विकी कौशलच्या ‘छावा’ या चित्रपटाच्या ट्रेलरबद्दल तुझे काय मत आहे, असा प्रश्न त्याला विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना तो म्हणाला, ‘ट्रेलर तर खूपच कमाल आहे. विकी कौशल हा अत्यंत प्रतिभावान कलाकार आहे. परंतु, महाराजांची भूमिका करण्यासाठी मराठी अभिनेत्याला निवडलं पाहिजे होतं, अशी माझी इच्छा आहे. राष्ट्रीय स्तरावरच्या या चित्रपटात इतक्या मोठ्या पडद्यावर ती भूमिका पाहणे एक वेगळाच अनुभव असता.

अजिंक्यने विकीच्या अभिनयाचे कौतुक केले असले तरी, त्याने महाराजांच्या भूमिकेसाठी मराठी कलाकाराची निवड झाली असती तर अधिक योग्य ठरले असते असे परखड मत मांडले.

Chhava l ‘मराठी कलाकार कुठे तरी कमी पडतोय का?’ :

कदाचित मराठी इंडस्ट्री आणि मराठी कलाकार म्हणून आपण कुठे तरी कमी पडतोय. लहान तोंडी मोठा घास पण प्रेक्षक म्हणून आणि मराठी इंडस्ट्रीचा प्रतिनिधी म्हणून मला असं वाटतं की ती भूमिका एखाद्या मराठी कलाकाराने साकारायला पाहिजे होती किंवा आगामी काळात मराठी कलाकाराने अशा भूमिका साकाराव्यात. चंदु चॅम्पियन (Chandu Champion) असो, मुंज्या (Munjya) असो किंवा महाराजांची भूमिका असो.. मराठी व्यक्तीने अशा भूमिका केल्या पाहिजेत असं मला वाटतं.’

अजिंक्य पुढे म्हणाला की, “आपण मराठी कलाकार आणि मराठी इंडस्ट्री म्हणून कुठे तरी कमी पडतो आहोत का? असा प्रश्न पडतो.” आगामी काळात अशा ऐतिहासिक भूमिकांसाठी मराठी कलाकारांना संधी मिळावी अशी अपेक्षा त्याने व्यक्त केली.

News Title: Marathi-Actor-Should-Have-Played-Sambhaji-Maharaj-in-Chhava-Says-Ajinkya-Raut

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now