भुजबळ यांच्यानंतर आता समता परिषदेचा मनुस्मृतीला विरोध

On: May 28, 2024 3:58 PM
Chhagan Bhujbal
---Advertisement---

Manusmriti | इयत्ता तिसरी ते इयत्ता बारावीच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आला. यामध्ये मनुस्मृतीचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्यात येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र आता मनुस्मृतीचा (Manusmriti) अभ्यासक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी विरोध दर्शवला आहे. त्यानंतर शरद पवार गट तसेच आता समता परिषदेचा मनुस्मृतीला (Manusmriti) विरोध दर्शवला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस नेते छगन भुजबळ, संभाजीब्रिगेड, तसेच आता समता परिषदेने देखील सरकारच्या शिक्षण धोरणात मनुस्मृतीच्या (Manusmriti) श्लोकांचा अभ्यासक्रमात समावेश करण्यास विरोध केला. आमची अशी विचारधारा नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

काय म्हणाले छगन भुजबळ?

समता परिषदेच्या विचारधारेशी मनुस्मृती (Manusmriti) विसंगत आहे. आमच्या विचारधारेत हे बसत नाही. शालेय अभ्यासक्रमात याचा समावेश करू नये, असं भुजबळ यांचं म्हणणं आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी विनाकारण संभ्रम निर्माण केला जात असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान लोकसभा निवडणुकीत महायुतीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ चार जागा मिळाल्या आहेत. त्यावेळी विधानसभेला चांगल्या जागा देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. त्या जागा आता मिळाव्यात अशी अपेक्षा आता छगन भुजबळ आणि प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केली होती.

“भाजप मोठा भाऊ”

भाजप मोठा भाऊ आहे हे आम्हाला मान्य आहे. त्यांचे मागील निवडणुकीत 100 पेक्षा जास्त आमदार होते. त्यांना जास्त जागा द्याव्या लागणार असल्याचं निश्चित आहे. देवेंद्र फडणवीस यांनी दोन पक्षांना सन्मानपूर्वक जागा घेतल्या होत्या. तेच आम्हाला अपेक्षित असल्याचं छगन भुजबळ म्हणाले आहेत.

दरम्यान आता मनोज जरांगे पाटील यांच्या उषोणाच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांच्यासह छगन भुजबळ आणि इतर ओबीसी नेते प्रकाश शेंडगे उपस्थित राहून बैठक घेणार असल्याचं दिसत आहे. या बैठकीत नेमके काय होणार? याबाबत येणारी वेळ सांगेल.

News Title – Manusmriti Add In Education Syllabus Against Chhagan Bhujbal And Samta Parishad

महत्त्वाच्या बातम्या

RBI कडून ‘या’ दोन बँकांवर मोठी कारवाई; ग्राहकांवर काय परिणाम होणार?

ब्रह्मपुरीत पारा 47 अंशांच्या पार; ‘या’ जिल्ह्यांना उष्णतेचा हायअलर्ट

“छगन भुजबळांना आवरा, वयाचा आदर करतो, पण उठसूट काहीही..”; ‘या’ नेत्याचा थेट इशारा

आंद्रे रसेल अन् अनन्या पांडेचा डान्स व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

अनंत-राधिकाचं प्री-वेडिंग होणार तब्ब्ल ‘इतक्या’ कोटींच्या क्रूझवर, जाणून घ्या फंक्शनचं पूर्ण वेळापत्रक

Join WhatsApp Group

Join Now