मराठा आरक्षणासंदर्भात जरांगे पाटलांची सर्वात मोठी घोषणा!

On: November 27, 2024 10:45 AM
manoj jarange
---Advertisement---

manoj jarange l गेल्या कित्येक महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे. अशातच आता मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी एक मोठी घोषणा केली आहे. आता जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी जालन्यातील अंतरवली सराटी गावात सामूहिक आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा प्रश्न चर्चेत आला आहे.

जरांगे पाटलांनी केलं आवाहन :

यावेळी जरांगे पाटील म्हणाले की, आता विधानसभा निवडणूक झाली असल्याने तो विषय देखील संपला आहे. त्यामुळे आता मराठ्यांनी पटापट डोक्यातून काढून टाका. तुमचं काय तुमच्या जातीचं काय, तसेच तुमचं अस्तित्वाचं काय आणि तुमच्या लेकराचे भविष्य काय असणार? त्यामुळे आता मराठा आरक्षणाच बघा. आता सगळ्या मराठ्यांनी आपल्या लेकराच्या भविष्याचं बघा.

दरम्यान, आता पुन्हा एकदा सर्व मराठ्यांनी एकजूट होऊन सामूहिक आमरण उपोषणाला आंतरवाली सराटी येथील तयारीला लागा असं आवाहन मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे.

manoj jarange l आमरण उपोषण कधी असणार? :

मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वांनी एकत्रित यावे. तसेच सरकार स्थापन झाल्यानंतर सामूहिक आमरण उपोषणाची तारीख देखील मी जाहीर करणार आहे. त्यामुळे सर्व मराठा समाजाने आंतरवालीकडे यायचं आहे असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.

याशिवाय जोपर्यंत आरक्षण देत नाही तोपर्यंत हे उपोषण चालणार आहे आणि मी जोपर्यंत मरणार नाही तोपर्यंत देखील आरक्षण चालू राहणार असल्याचं ते म्हणाले आहेत. तसेच आता मी यावर ठाम आहे. हे आमरण उपोषण अंतरवाली सराटीमध्येच होणार असल्याची मोठी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.

News Title : manoj jarange patil big announcement about mass hunger strike

महत्त्वाच्या बातम्या- 

आताची सर्वात मोठी बातमी, देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री…

‘शिंदेंसोबत तसं काहीही ठरलं नव्हतं’, दिल्लीतील नेत्याने सगळं सांगूनच टाकलं

फडणवीसांना नाहीतर ‘या’ महिला नेत्याला मुख्यमंत्री करा! कोणी केली मागणी

‘सेक्स लाईफमुळे बाॅलिवूडमध्ये…’; वकीलांनी दिलेल्या माहितीमुळे खळबळ

पराभव जिव्हारी लागला; ‘या’ बड्या नेत्याची राजकारणातून निवृत्तीची घोषणा

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now