Manish Malhotra Mother Death | बॉलिवूडमधील प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांच्या आई गरिमा मल्होत्रा (Garima Malhotra) यांचं निधन झाल्याची दु:खद बातमी समोर आली आहे. त्यांच्या निधनामागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या घटनेमुळे मल्होत्रा कुटुंबावर शोककळा पसरली असून बॉलिवूड इंडस्ट्रीतही हळहळ व्यक्त होत आहे.
गरिमा मल्होत्रा या मुंबईतील त्यांच्या राहत्या घरीच राहत होत्या. तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या निधनानंतर इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी मनीष मल्होत्राच्या घरी पोहोचून श्रद्धांजली अर्पण करत आहेत.
बॉलिवूड सेलिब्रिटींची उपस्थिती :
गरिमा मल्होत्रा (Garima Malhotra) यांच्या निधनाची बातमी कळताच बॉलिवूडमधील अनेक कलाकार मनीष मल्होत्राच्या घरी दाखल झाले. यामध्ये करण जोहर , मलाईका अरोरा , अर्जुन कपूर, करिष्मा कपूर, वरून धवन, सोनाली बेंद्रे, उर्मिला मातोंडकर आणि फातिमा सना शेख यांचा समावेश आहे. सर्वांनी मल्होत्रा कुटुंबाची भेट घेत त्यांना धीर दिला. (Manish Malhotra Mother Death)
गरिमा मल्होत्रा या मनीष मल्होत्राच्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाची व्यक्ती होत्या. मनीष अनेकदा आपल्या आईविषयी प्रेमाने बोलताना दिसत असे. त्याच्या कारकिर्दीत आईचा मोठा वाटा असल्याचं तो विविध मुलाखतींमध्ये सांगत आला आहे.
Manish Malhotra Mother Death | आईनेच दिलं फॅशन क्षेत्रात येण्याचं प्रोत्साहन :
मनीष मल्होत्रा यांनी यापूर्वी अनेकदा सांगितलं होतं की, त्यांना लहानपणापासूनच कपडे आणि चित्रपट यांचं प्रचंड आकर्षण होतं. ते आईच्या साड्यांपासून वेगवेगळे कपडे तयार करत असत. त्यांच्या या आवडीला आईने नेहमीच प्रोत्साहन दिलं.
2019 मध्ये मनीष मल्होत्राने आपल्या वडिलांनाही गमावलं होतं. त्यानंतर आईसोबत त्याचं विशेष नातं अधिक घट्ट झालं होतं. 2024 मध्ये ‘मदर्स डे’निमित्त त्याने सोशल मीडियावर आईसाठी भावनिक पोस्ट लिहिली होती. “माझी आईच माझी ताकद, प्रेरणा आणि माझी सर्वात जवळची साथीदार आहे,” असं म्हणत त्याने आईबद्दलच्या भावना व्यक्त केल्या होत्या.
News Title: Manish Malhotra’s Mother Garima Malhotra Passes Away; Karan Johar, Malaika Arora, Arjun Kapoor Pay Tribute
Manish Malhotra Mother Death, Garima Malhotra, Bollywood News, Karan Johar, Malaika Arora, Arjun Kapoor, Bollywood Celebrity News, मनीष मल्होत्रा आई निधन, बॉलिवूड बातम्या, गरिमा मल्होत्रा, सेलिब्रिटी श्रद्धांजली






