मोठी बातमी समोर! मंत्रालयात घडलेल्या प्रकाराने महाराष्ट्रात खळबळ

On: February 25, 2025 5:42 PM
Mantralaya Entry Rules Change
---Advertisement---

Mumbai Mantralaya | मुंबईतील मंत्रालयात (Mumbai Mantralaya) पुन्हा एकदा आत्महत्येचा प्रयत्न झाला आहे. एका तरुणाने मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारली, मात्र सुरक्षा जाळीमुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेने मंत्रालयात एकच खळबळ उडाली.

सुरक्षा जाळीमुळे मोठा अनर्थ टळला

सुमारे 40 ते 45 वर्षे वयाच्या या तरुणाने मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेतली. सुदैवाने तो मंत्रालयाच्या संरक्षक जाळीत अडकला, त्यामुळे त्याचा जीव वाचला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत त्याला सुरक्षित बाहेर काढले.

काम रखडल्यानं उडी घेतली?

प्राथमिक माहितीनुसार, या तरुणाचे काम महसूल विभागात (Revenue Department) प्रलंबित होते. वारंवार प्रयत्न करूनही काम होत नसल्याने तो वैतागला होता. उडी मारण्यापूर्वी त्याने “इंकलाब जिंदाबाद” अशा घोषणा दिल्या.

तरुणाने उडी मारण्यापूर्वी एक पत्र लिहिले होते, ज्यामध्ये “जागा शिल्लक वारे महसूल खाते” असा उल्लेख होता. जागेसंदर्भात न्याय मिळत नसल्याने हा टोकाचा निर्णय घेतल्याचे त्याने पत्रात लिहिले होते. (Mumbai Mantralaya)

घटनेनंतर मंत्रालयात मोठी धावपळ उडाली. पोलिसांनी आणि सुरक्षा रक्षकांनी तातडीने त्याला जाळीतून बाहेर काढले. त्यानंतर पुढील कारवाईसाठी त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

Title : Man Jumps from 4th Floor of Mumbai Mantralaya

 

Join WhatsApp Group

Join Now