‘हा महादेव आणि महाकालीचा आदेश…’; ममता कुलकर्णीचं वक्तव्य चर्चेत

On: January 25, 2025 3:53 PM
Mamta Kulkarni
---Advertisement---

Mamta Kulkarni l बऱ्याच काळापासून चित्रपटसृष्टीपासून दूर असलेल्या अभिनेत्री ममता कुलकर्णी यांनी आता पूर्णपणे अध्यात्माचा मार्ग स्वीकारला आहे. त्यांनी आज प्रयागराज महाकुंभमध्ये संन्यास घेतला आहे.

महादेव (Mahadev) आणि महाकाली (Mahakali) यांच्या आज्ञेवरून तसेच आपल्या गुरूंच्या आदेशाचे पालन करून आपण हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

नुकताच त्यांनी संगम (Sangam) येथे पिंड दान केल्याचे वृत्त आहे. यावर प्रतिक्रिया देताना ममता कुलकर्णी म्हणाल्या, “यावर मी काय बोलणार? हा महादेव आणि महाकालीचा आदेश होता. माझ्या गुरूंचा आदेश होता. आज त्यांनी निवड केली. मी काहीही केलेले नाही.”

किन्नर आखाड्यात (Kinnar Akhada) महामंडलेश्वर (Mahamandaleshwar) पद :

आज, शुक्रवार, २४ जानेवारी रोजी संध्याकाळी ममता कुलकर्णी यांनी संगम येथे पिंड दान केले. त्यानंतर किन्नर आखाड्यात त्यांचा पट्टाभिषेक करण्यात आला. त्या आता किन्नर आखाड्यात महामंडलेश्वर बनल्या आहेत. किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर लक्ष्मी त्रिपाठी (Laxmi Tripathi) यांनी ममता कुलकर्णी यांच्या या निर्णयाबद्दल सविस्तर माहिती दिली.

त्या म्हणाल्या की, ममता गेल्या दोन वर्षांपासून त्यांच्या संपर्कात होत्या आणि त्यांना सनातन धर्मात (Sanatan Dharma) सामील व्हायचे होते. पूर्वी त्या जुना आखाड्याच्या (Juna Akhada) शिष्या होत्या. त्यानंतर त्यांनी आमच्याशी संपर्क साधून महामंडलेश्वर होण्याची इच्छा व्यक्त केली. आम्ही त्यांना या पदासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टींची पूर्तता करावी लागेल असे सांगितले.

Mamta Kulkarni l गृहस्थाश्रमाचा त्याग आणि संन्यासी जीवन :

ममता कुलकर्णी आता गृहस्थाश्रमाचा त्याग करून संन्यासी जीवन जगणार आहेत. दीक्षा घेतल्यानंतर त्यांना महामंडलेश्वर पद बहाल करण्यात आले. शुक्रवारी भगवे वस्त्र परिधान करून ममता कुलकर्णी महाकुंभाच्या सेक्टर क्रमांक १६ मध्ये असलेल्या किन्नर आखाड्याच्या शिबिरात पोहोचल्या. तेथे त्यांचा रितसर पट्टाभिषेक करण्यात आला.

News Title : Mamta Kulkarni Embraces Spiritual Life

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now