मलायका अरोरा पुन्हा चढणार बोहल्यावर? दुसऱ्या लग्नाबद्दल पहिल्यांदाच उघडपणे बोलली; चाहत्यांमध्ये चर्चांना उधाण!

On: December 31, 2025 3:10 PM
Malaika Arora
---Advertisement---

Malaika Arora | बॉलिवूडमधील फिटनेस आयकॉन म्हणून ओळखली जाणारी मलायका अरोरा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. वयाच्या ५२व्या वर्षीही तिचा आत्मविश्वास, फिटनेस आणि स्पष्ट मतं अनेकांसाठी प्रेरणादायी ठरतात. व्यावसायिक आयुष्याइतकंच तिचं वैयक्तिक आयुष्यही कायमच चर्चेचा विषय राहिलं आहे. अरबाज खानसोबतच्या घटस्फोटानंतर मलायकानं दुसरं लग्न करणार का, हा प्रश्न अनेकांच्या मनात होता. यावर आता खुद्द मलायकानं आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे.

मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचं लग्न १९९८ मध्ये झालं होतं. त्यांना अरहान खान नावाचा मुलगा आहे. मात्र, कालांतरानं दोघांमध्ये मतभेद वाढत गेले आणि अखेर २०१७ मध्ये त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतर अरबाज खाननं दुसरं लग्न केलं, तर मलायका मात्र अजूनही अविवाहित आहे. यामुळे तिच्या दुसऱ्या लग्नाबाबतच्या चर्चा नेहमीच रंगताना दिसतात. (Arbaaz Khan Divorce)

कमी वयात लग्न करणं ही चूक; तरुणींना मलायकाचा सल्ला :

एका मुलाखतीदरम्यान मलायका अरोरानं लग्नाबाबत अत्यंत प्रामाणिक मत व्यक्त केलं. तिनं स्पष्टपणे सांगितलं की, महिलांनी आणि मुलींनी खूप लहान वयात लग्न करण्याची घाई करू नये. आयुष्यात आधी स्वतःला ओळखणं, अनुभव घेणं आणि स्वतःच्या पायावर उभं राहणं गरजेचं आहे, असं मलायकाचं मत आहे. तिनं स्वतःच्या अनुभवातून लवकर लग्न करणं ही चूक ठरल्याचंही मान्य केलं. (Malaika Arora Second Marriage)

मलायका म्हणाली की, वैवाहिक जीवनात अनेक सुंदर क्षण मिळतात, त्यातला सर्वोत्तम अनुभव म्हणजे लहान वयात आई होणं. मात्र, त्याचबरोबर महिलांनी आर्थिक आणि भावनिकदृष्ट्या सक्षम होणं तितकंच महत्त्वाचं आहे. आयुष्य थोडंसं जगून, स्वतःला समजून घेतल्यानंतरच लग्नाचा निर्णय घ्यावा, असा सल्ला तिनं तरुणींना दिला आहे.

Malaika Arora | आता मलायका अरोरा दुसरं लग्न करणार का? :

दुसऱ्या लग्नाबाबत बोलताना मलायकानं अत्यंत संतुलित भूमिका घेतली. ती म्हणाली की, तिला अजूनही लग्न या संकल्पनेवर विश्वास आहे, मात्र ती लग्न शोधत बसलेली नाही. जर आयुष्यात योग्य व्यक्ती भेटली आणि परिस्थिती जुळून आली, तर ती दुसरं लग्न करण्यासाठी पूर्णपणे खुली आहे. पण सध्या ती स्वतःच्या आयुष्यात समाधानी असल्याचं तिनं स्पष्ट केलं. (Malaika Arora Second Marriage)

मलायका म्हणाली की, तिला प्रेमाची कल्पना आवडते, प्रेम देणं आणि मिळवणं तिला महत्त्वाचं वाटतं. आयुष्यात सुंदर नातं जोपासण्याची संधी मिळाली, तर ती नक्की स्वीकारेल. “जर ते माझ्या दारावर ठोठावलं, तर मी ते नक्की स्वीकारेन,” असं म्हणत मलायकानं दुसऱ्या लग्नाबाबतची आपली भूमिका मोकळेपणानं मांडली आहे. सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक चर्चा सुरू असल्या तरी, मलायका मात्र आपल्या अटींवर आणि स्वतःच्या आनंदाला प्राधान्य देत आयुष्य जगताना दिसते.

News Title: Malaika Arora Opens Up on Second Marriage After Divorce with Arbaaz Khan

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now