अर्जुनसोबत ब्रेकअपच्या चर्चेवर अखेर मलायकाने सोडलं मौन; म्हणाली..

On: June 1, 2024 1:05 PM
Malaika Arora Arjun Kapoor Relationship
---Advertisement---

Malaika Arora | बॉलीवुड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) आणि अर्जुन कपूर (Arjun Kapoor) नेहमीच आपल्या रिलेशनशिपमुळे चर्चेत असतात. अनेक कार्यक्रमात ते दोघे एकत्र दिसून येतात.मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगत होत्या.

दोन महिन्यांपासून ते एकमेकांपासून दूर राहत असल्याचंही म्हटलं गेलं. आता पुन्हा एकदा त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चेनी जोर धरला आहे. त्यांनी आपलं नातं तोडल्याची देखील जोरदार चर्चा झाली. अखेर या सर्व बातम्यांवर मोठा खुलासा झाला आहे.

अर्जुन आणि मलायका यांचा ब्रेकअप झालाय?

यावेळी मलायका ब्रेकअपच्या बातम्यांमुळे चांगलीच भडकली. तिच्या मॅनेजरने हे वृत्त अफवा असल्याचं स्पष्ट केलं. काही मीडिया रिपोर्टनुसार, मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर खरोखरच वेगळे झाले आहेत का, असे मॅनेजरला विचारण्यात आले. यावेळी मॅनेजरने हे वृत्त अफवा असल्याचं स्पष्ट केलं.

मलायका (Malaika Arora) आणि अर्जुन यांचं नातं अजूनही मजबूत असून ते दोघेही एकमेकांचा खूप आदर करतात.त्यांच्यात कोणताही गैरसमज नाही, असं मलायकाच्या मॅनेजरने म्हटलं असल्याचं काही मीडिया रिपोर्टमध्ये म्हटलंय. मात्र, अजूनही माध्यमांमध्ये त्यांच्या वेगळं होण्याच्या चर्चा सुरू आहेत.

मलायकाच्या मॅनेजरकडून मोठा खुलासा

मलायका आणि अर्जुन यांनी 2018 मध्ये एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली होती. 2019 मध्ये त्यांनी आपलं नातं जगजाहीर केलं. त्यांनी एकमेकांसोबत खूप टाइम व्यतीत केला. दोघेही अनेक कार्यक्रमात एकत्र सहभागी व्हायचे, मात्र, आता ते वेगळे झाल्याच्या चर्चा रंगत आहेत.

इतकंच नाही तर, वेगळं होऊनही मलायका आणि अर्जुन एकमेकांचा आदर करतात.त्यांच्यात अजूनही एकमेकांप्रती सन्मान असल्याचं म्हटलं जातंय. पाहायला गेलं तर, अद्याप मलायका (Malaika Arora) आणि अर्जुन यांनी दोघांनीही याबाबत अधिकृत असं काहीही सांगितलं नाहीये. मात्र, चाहते या वृत्तामुळे चिंतेत पडले आहेत.

News Title – Malaika Arora Arjun Kapoor Relationship

महत्वाच्या बातम्या-

तुम्हाला माहितीये का? 1 जूनला सरकारी बड्डे का असतो?

4 जूनला कुणाचं सरकार येणार?; सट्टा बाजाराची भविष्यवाणी आली समोर

मान्सूनची दणक्यात एंट्री; पुढील दोन दिवस ‘या’ जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता, अलर्ट जारी

आनंदाची बातमी! केंद्र सरकारने ग्रॅच्युइटी रकमेत केली मोठी वाढ

महिन्याच्या पहिल्याच दिवशी आनंदाची बातमी; गॅस सिलिंडरचे दर ‘तब्बल’ इतक्या रुपयांनी झाले स्वस्त

Join WhatsApp Group

Join Now