मुंबई | अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) आणि अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आपल्या रिलेशनशिपमुळे कायम चर्चेत असतात. अनेक कार्यक्रमात ते दोघे एकत्र दिसून येतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगत होत्या. दोन महिन्यांपासून ते एकमेकांपासून दूर राहत असल्याचंही म्हटलं गेलं. आता पुन्हा एकदा त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगल्या आहेत. दोघांनी मोठा निर्णय घेतल्याच्या चर्चा सुरू आहेत.
मलायका-अर्जुनचं ब्रेकअप?
दोघांनी नात्यावर मौन बाळगलं आहे. कारण सर्वत्र चर्चांना कारण नको म्हणून मलायका-अर्जुन यांनी अधिकृत घोषणा केलेली नाही. दोघांचं नातं फार काळ टिकलं, पण आता दोघांनी देखील विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.
विभक्त झाले असले तरी कोणत्याही कठीण परिस्थितीत दोघे एकमेकांसाठी उभे राहतील. लोकांनी त्यांच्या गोपनियतेचा आदर करावा, असं देखील सांगण्यात येत आहे.
मलायकाचा एक्स नवरा अरबाजने शूरा खानसोबत लग्नगाठ बांधली. अरबाजच्या लग्नात मलायकाचा मोठा मुलगाही सामील झाला होता. अरबाजच्या लग्नानंतर सर्वांच्या नजरा अर्जुन-मलायका यांच्यावर येऊन थांबल्या होत्या. पण आता दोघांचं ब्रेकअप झाल्याची माहिती समोर येत आहे.
मलायका-अर्जुन एकमेकांचा सन्मान करतात. विभक्त होण्याचा निर्णय देखील दोघांनी सहमतीने घेतल्याचं बोललं जात आहे. दोघांच्या नात्याचा प्रवास आता संपला असल्याची माहिती समोर आली आहे.
Malaika Arora पुन्हा लग्न करणार का?
दरम्यान, ‘झलक दिखला जा 10’च्या मंचावर फराह खाननेही मलायकाला (Malaika Arora) विचारलं होतं की ती 2024 मध्ये पुन्हा लग्न करण्याचा विचार करतेय काय? यावर मलाइकाने “माझ्या आयुष्यात कोणी असेल तर मी त्याच्याशी लग्न करेन. कुणी मला लग्नाची मागणी घातली तर मी लगेच लग्न करेल”, असं म्हटलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या-
पुणे अपघाताला नवं वळण; आरोपीसोबत असलेल्या अल्पवयीन मुलांच्या जबाबात मोठा खुलासा
‘सुंदर स्त्री आपल्यापेक्षा हीन जातीतली असली तरी…’; किरण मानेंची पोस्ट चर्चेत
पुणे अपघातप्रकरणी मोठी माहिती समोर, त्या रात्री विशाल अग्रवाल यांनी सुनील टिंगरेंना…
शाहरुख खान ‘या’ गोष्टीत कधीही यशस्वी होणार नाही; गौतम गंभीर असं का म्हणाला?






